आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

46 वर्षांचा झाला अभिषेक:बाबा बच्चन आहे अभिषेकचे खरे नाव, चित्रपट फ्लॉप झाल्यावर व्हायचे होते LIC एजंट, 203 कोटींचा मालक आणि नावावर आहेत अनेक रेकॉर्ड

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिषेकबद्दलच्या काही खास आणि न ऐकलेल्या गोष्टी-

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आज त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. वडील अमिताभ आणि आई जया यांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिषेकने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. मात्र तो यशस्वी अभिनेत्याचा मान मिळवू शकला नाही. एका सुपरस्टारचा मुलगा असल्याने लोकांच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण त्याचा संघर्ष आउटसाइडप्रमाणेच राहिला आहे. आज अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या खास निमित्त जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित काही खास आणि न ऐकलेल्या गोष्टी-

अभिषेक बच्चन यांना जन्मानंतर त्याचे नाव बाबा बच्चन ठेवण्यात आले. त्याचे हे खरे नाव फारशा लोकांना माहीत नाही, मात्र त्याच्या जन्म प्रमाणपत्रावर हेच नाव आहे.

अभिषेकला वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी डिस्लेक्सिया नावाच्या आजाराने ग्रासले होते. 'तारे जमीन पर' हा बॉलिवूड चित्रपट याच आजारावर आहे. या आजाराने ग्रस्त मुलांना शब्द लिहिण्यास आणि समजण्यास त्रास होतो.

अभिषेकने बिझनेसचा अभ्यास करण्यासाठी बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला, पण बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी त्याने शिक्षण अर्धवट सोडले.

अभिषेक बच्चन 1998 मध्ये आलेल्या मेजर साहब या चित्रपटाच्या प्रॉडक्शनचे काम पाहिले होते. मात्र, एका मुलाखतीत त्याने सांगितले की, सेटवर त्याला चहा बनवावा लागत असे आणि लाइट्स उचलण्याचे काम देखील त्याने केले होते. या चित्रपटादरम्यानच त्याने अभिनेता होण्याचा निर्णय घेतला होता.

अभिषेक बच्चनने 2000 साली जेपी दत्ता यांच्या रिफ्युजी या चित्रपटातून करीना कपूरसोबत पदार्पण केले. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट असला तरी तो फ्लॉप ठरला होता.

करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम'मध्ये अभिषेक बच्चन एक छोटी भूमिका साकारणार होता, मात्र काही कारणास्तव फायनल एडिटिंगमधून त्याची सर्व दृश्य काढून टाकण्यात आली होती.

2000-2004 या चार वर्षांत अभिषेकने 17 फ्लॉप चित्रपट केले. याचे कारण म्हणजे अभिषेक पटकथेकडे लक्ष न देता थेट चित्रपट साइन करायचा.

फिल्मी करिअर फ्लॉप झाल्यानंतर, अभिषेकने एलआयसी एजंट होण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याने ही नोकरी काही दिवसांतच सोडली.

2004 मध्ये अभिनेत्याने धूम चित्रपटात काम केले जो ब्लॉकबस्टर हिट ठरला. त्यानंतर त्याने बंटी और बबली, युवा, ब्लफमास्टर, गुरू असे हिट सिनेमे दिले.

अभिषेकच्या नावावर अनेक विक्रम

दिल्ली 6 चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिषेक बच्चनने अवघ्या 12 तासात 1800 किमीचा प्रवास केला होता. मुंबई, गाझियाबाद, नोएडा, फरीदाबाद, चंदीगड यांसारख्या अनेक शहरांमध्ये एकाच दिवशी प्रमोशनल इव्हेंटमध्ये उपस्थित राहून अभिनेत्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. या बाबतीत अभिषेकने विल स्मिथला मागे टाकले, ज्याने 2 तासांत तीन कार्यक्रमांना हजेरी लावली होती.

'पा' या चित्रपटासाठी अभिषेकच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही आहे. चित्रपटात वडिलांच्या वडिलांची भूमिका करणारा तो पहिला अभिनेता होता. या चित्रपटात अमिताभ यांनी अभिषेकच्या मुलाची भूमिका वठवली होती.

2002 मध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या 60 व्या वाढदिवशी अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या एंगेजमेंटची घोषणा केली होती. एका इव्हेंटमध्ये जया यांनी करिश्माला त्यांची सून म्हणूनही हाक मारली होती, मात्र 2003 मध्ये हा साखरपुडा तुटला. लग्नानंतर आपल्या सुनेने चित्रपटात काम करू नये, अशी जयाची इच्छा होती, पण ही अट करिश्मा आणि तिच्या आईला मान्य नव्हती.

करिश्मानंतर अभिषेकचे नाव ऐश्वर्या रायसोबत जोडले गेले. दोघांनी ढाई अक्षर प्रेम के, कुछ ना कहो, गुरु, धूम 2, रावण, बंटी और बबली यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले. 14 जानेवारी 2007 रोजी साखरपुडा झाल्यानंतर या जोडप्याने 20 एप्रिल 2007 रोजी मुंबईत लग्न केले. हे इंडस्ट्रीतील सर्वात महागडे लग्न होते. या कपलला आराध्या ही मुलगी आहे.

अभिषेक ऐश्वर्याला त्यांच्या मुलीचे नाव ठेवायला 5 महिने लागले. मुलीचे कान टोचताना अभिषेकने स्वतः पिअरसिंग केले, जेणेकरून त्याला मुलीप्रमाणे वेदना जाणवू शकतील.

ओटीटीने करिअरची गाडी आली रुळावर
अभिषेक बच्चन 2020 साली OTT प्लॅटफॉर्मकडे वळला. त्याचा पहिला चित्रपट लुडो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. यानंतर, त्याने 2021 च्या सोलो लीड असलेल्या द बिग बुल या चित्रपटात हर्षद मेहताची भूमिका साकारली. डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील अभिनयासाठी अभिनेत्याचे खूप कौतुक झाले. यानंतर अभिषेक नोव्हेंबर 2021 मध्ये Zee5 वर रिलीज झालेल्या बॉब बिस्वासमध्ये दिसला.

लवकरच अभिषेक यामी गौतमसोबत दसवी आणि SSS-7 मध्ये दिसणार आहे.

अभिषेक बच्चन 203 कोटींचा मालक आहे
अभिनेत्याची एकूण संपत्ती 28 मिलियन डॉलर म्हणजेच 203 कोटी रुपये आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, अभिषेक ब्रँड एंडोर्समेंटमधून भरपूर कमाई करतो. याशिवाय, तो प्रो कबड्डी लीग संघ जयपूर पिंक पँथर आणि इंडियन सुपर लीग फुटबॉल संघ चेन्नई एफसीचा मालक आहे.

बातम्या आणखी आहेत...