आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतसाठी न्यायाची मागणी:सुशांतसाठी रामदेव बाबांचे 'होमहवन',  म्हणाले - 'सुशांतचा जीव मारेकऱ्यांनी घेतला, आता त्याच्या आत्म्याला न्याय मिळाला पाहिजे'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाबा रामदेव यांनी हरिद्वार येथे सुशांत सिंह राजपूतच्या आत्म्याच्या शांतीसाठी होमहवन केले.
  • सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने दोन महिन्यांपूर्वी या जगाचा निरोप घेतला. आज 15 ऑगस्ट रोजी त्याच्यासाठी जगभरातून प्रार्थना केली जात आहे. सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने स्वातंत्रदिनाच्या दिवशी एकत्र येण्याचे आणि सामुहिक स्वरुपात दिवंगत अभिनेत्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये आता बाबा रामदेव देखील जोडले गेले आहेत.

सुशांतच्या आत्म्याला शांती मिळावी याकरीता बाबा रामदेव यांनी हरिद्वारमध्ये होमहवन केले. आज बाबा रामदेव यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला. त्यात ते म्हणाले, 'मी सुशांतच्या बहिणी आणि कुटुंबीयांशी बातचीत केली, मी जेव्हा त्यांचे दु:ख ऐकले तेव्हा माझा आत्मा देखील थरारला. आम्ही सर्व पतंजली योगपीठमध्ये त्याच्या आत्म्यासाठी प्रार्थना करत आहोत. देव त्याच्या आत्म्यास शांती देवो, सुशांत आणि त्याच्या परिवाराला न्याय मिळो.'

बाबा रामदेव यांचे ट्विट

व्हिडिओमध्ये पुढे रामदेव बाबांनी म्हटले की, 'आज आप स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत आणि आपल्याला हे स्वातंत्र्य त्याकरता मिळाले आहे जेणेकरून सर्वांना न्याय मिळेल. कोणावरही कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही. बाबा रामदेव यांनी असे वक्तव्य केले आहे की, सुशांतचा जीव मारेकऱ्यांनी घेतला, आता त्याच्या आत्म्याला न्याय मिळाला पाहिजे. त्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा जे दारोदारी भटकून खस्ता खात आहेत. आमची हीच प्रार्थना असेल की लवकरच सुशांतला न्या मिळेल.' यावेळी बाबा रामदेव यांच्याबरोबर पतंजली योगपीठातील सदस्य सहभागी झाले होते.

  • सुशांतसाठी झाली ग्लोबल प्रेयर

आज सुशांतच्या बहिणीने एका ग्लोबल प्रेयरचे आयोजन केले होते. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकितालोखंडे हिने देखील लोकांना #GlobalPrayersForSSR मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. सुशांतच्या बहिणीसह त्याच्या लाखो चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली. सकाळी 10 वाजल्यापासून अनेकांनी सुशांतच्या आत्म्याच्या शांतीसाठी हात जोडून फोटो पोस्ट केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...