आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागायिका श्रेया घोषाल लवकरच आई होणार आहे. गेल्याच महिन्यात श्रेयाने ती आई होणार असल्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. दरम्यान 11 एप्रिल रोजी श्रेयाने तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो चाहत्यांसह शेअर केले आहे. श्रेयाच्या मैत्रिणींनी तिला सरप्राईझ देत ऑनलाईन डोहाळेजेवण आयोजित केले होते. विशेष म्हणजे तिच्या मैत्रिणींनी खास तिच्यासाठी बनवलेले पदार्थही तिला पाठवले होते.
श्रेयाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्रिणींचे मानले आभार
श्रेयाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'लांब असूनही जेव्हा तुमच्या मैत्रिणींना तुमचे लाड पुरवायचे असतात. माझ्या ‘बावरी’जकडून ऑनलाईन सरप्राईझ डोहाळेजेवण… प्रत्येकीने स्वतःच्या हाताने काहीतरी करून पाठवले. खूप मज्जा आली, खेळही खेळले. मी किती लकी आहे!,' फोटोंमध्ये श्रेया तिच्या मैत्रिणींशी गप्पा मारताना दिसत आहे.
श्रेयाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती गोड बातमी
श्रेयाने गेल्या महिन्यात आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा करत सोशल मीडियावर लिहिले होते की, "बेबी श्रेयादित्यचे आगमन होत आहे. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात छान भावना आहे. मी आयुष्यातल्या सर्वात सुंदर काळात आहेत. खरंच हा देवाचा चमत्कार आहे.' सोशल मीडिया यूजर्स श्रेयाला शुभेच्छा देत आहेत
श्रेया-शिलादित्य लग्नाच्या सहा वर्षांनी होत आहेत आईबाबा
5 फेब्रुवारी 2015 रोजी श्रेया घोषालने शिलादित्य मुखोपाध्यायशी लग्न केले. हा सोहळा एक संपूर्ण खासगी सोहळा होता, ज्यात दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि निवडक मित्र उपस्थित होते. श्रेयाने स्वतः ही बातमी 6 फेब्रुवारी रोजी तिच्या चाहत्यांना दिली होती. लग्नाचा एक फोटो शेअर करत श्रेयाने फेसबुकवर लिहिले होते, "काल रात्री मी माझ्या कुटुंबीयांच्या आणि मित्रांच्या उपस्थितीत शिलादित्यशी लग्न केले. नवीन आयुष्यासाठी मी उत्सुक आहे."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.