आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेत्या 12 फेब्रुवारी रोजी 'बिग बॉस' हिंदीच्या 16व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. या पर्वात अमरावतीच्या शिव ठाकरेने स्पर्धकांसह चाहत्यांचीही मने जिंकली आहेत. शिव बिग बॉस हिंदीच्या घरातील सर्वाधिक चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. शिव ठाकरेने बिग बॉस हिंदीच्या ट्रॉफीवर नाव कोरावे, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. ट्विटरवर 'विजयी भव शिव ठाकरे' असे ट्रेंडही होत आहे. आता महाराष्ट्राच्या राजकारणातील एका बड्या नेत्याने त्याला पाठिंबा दर्शवला आहे.
बच्चू कडूंचा शिव ठाकरेला पाठिंबा
आमदार बच्चू कडू यांनी शिव ठाकरेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट अनेकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. बच्चू कडू यांनी शिवचा त्याच्या पान टपरीवरील फोटो शेअर केला आहे. सोबतच त्यांनी लिहिले की, 'अतिशय सामान्य कुटुंबातून अमरावती येथील शिव ठाकरे बिग बॉस हिंदीच्या फायनलपर्यंत पोहचला आहे.' त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये शिवला वोट करण्याचेही आवाहन केले आहे.
शिवच्या वडिलांची ही पान टपरी असून शिव लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचण्याआधी वडिलांना याठिकाणी मदतही करायचा. त्याच्या या साधेपणामुळे शिवने अनेकांचे मन जिंकले असून, बच्चू कडूंनीही त्याला पाठिंबा दिला.
याआधी एका मुलाखतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनीही शिवला पाठिंबा दर्शवला होता.
बिग बॉस 16 मधील लेटेस्ट अपडेटनुसार निम्रित कौर अहलुवालिया पहिली फायनलिस्ट असून इतर स्पर्धक फिनालेमध्ये जागा मिळवण्यासाठी धडपडत आहेत. 09 मिनिटे कोणत्याही घड्याळ्याशिवाय मोजण्याच्या 'टिकिट टू फिनाले' टास्कमध्ये 'शिव की मंडली' मागे पडल्याने शिव, एमसी स्टॅन आणि सुंबुल तौकिर खान या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. या तिघांपैकी एकाचा प्रवास याच आठवड्यात संपेल.
शिव ठाकरे याआधी ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. आता अंतिम फेरीत तो मजल मारणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.