आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटिश अॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (बाफ्टा) पुरस्कार 2021 ची सुरुवात शनिवारी अर्थातच 10 एप्रिलपासून (भारतीय वेळेनुसार 11 एप्रिल) झाली आहे. 74 व्या बाफ्टा पुरस्कार सोहळ्याच्या उद्घाटन सोहळ्यात एकूण 25 पैकी 8 श्रेणीतील पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली.
'मा रॅने ब्लॅक बॉटम'ने 2 पुरस्कार जिंकले
समारंभाच्या पहिल्या दिवशी साउंड, कास्टिंग, कॉश्च्युम डिझाइन, मेकअप अँड हेअर, प्रॉडक्शन डिझाइन, ब्रिटीश शॉर्ट फिल्म, ब्रिटीश शॉर्ट अॅनिमेशन आणि स्पेशल व्हिज्युअल इफेक्ट या श्रेणीत पुरस्कार देण्यात आले. 'मा रॅने ब्लॅक बॉटम'ने दोन पुरस्कार जिंकले. या म्युझिक ड्रामा चित्रपटाने कॉश्च्युम डिझाइन आणि मेकअप अँड हेअर या कॅटेगरीत पुरस्कार जिंकले.
ख्रिस्तोफर नोलनच्या 'टेनेट'नेही पुरस्कार जिंकला
लोकप्रिय अमेरिकन दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनच्या 'टेनेट' चित्रपटाला स्पेशल व्हिज्युअल इफेक्ट्स श्रेणीत पुरस्कार मिळाला. याशिवाय 'साउंड ऑफ मेटल', 'मँक', 'रॉक्स' यासह अनेक चित्रपटांनी वेगवेगळ्या श्रेणीत पुरस्कार जिंकले. बाफ्टा पुरस्कार सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअली आयोजित करण्यात आला आहे. समारंभाच्या दुसर्या दिवशी, रविवारी, 11 एप्रिल रोजी (भारतीय वेळेनुसार 12 एप्रिल) उर्वरित श्रेणीतील पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली जाईल.
बाफ्टा पुरस्कार 2021 च्या 8 श्रेणीतील विजेत्यांची यादी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.