आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 ऑक्टोबरला रिलीज होणार चित्रपट:चहा विक्रेत्या बाल नरेनचा ट्रेलर रिलीज; सत्य घटनेवर आधारित, कोरोनापासून गावाला वाचवले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा बहुचर्चित चित्रपट बाल नरेनचा ट्रेलर शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. सत्य घटनांवर आधारित हा एक सामाजिक चित्रपट आहे. या चित्रपटात एका 14 वर्षांच्या मुलाची कथा आहे ज्याने आपल्या गावाला कोरोनामध्ये वाचवले. बाल नरेन हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानापासून प्रेरित असून, यात यज्ञ भसीन, बिदिता बाग, रजनीश दुग्गल, गोविंद नामदेव आणि विंदू दारा सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

ट्रेलरमध्ये कोरोना महामारीच्या काळातील कथा दाखवण्यात आली आहे. या साथीमुळे एका छोट्या गावात प्रचंड भीती आहे. त्याचबरोबर गावात स्वच्छतेच्या विशेष सूचना दिल्या आहेत. आपले गाव स्वच्छ करण्यासाठी बाल नरेन म्हणजेच बाल कलाकार यज्ञ भसीन याने पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचा संकल्प पूर्ण केला. यादरम्यान बाल नरेनला अनेक अडचणी आणि चढ-उतारांचा सामना करावा लागतो. हा चित्रपट 14 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन नागपाल यांनी केले आहे, तर बाल नरेन चित्रपटाची निर्मिती दीपक मुकुट यांनी केली आहे. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...