आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध टीव्ही मालिका 'बालिका वधू'मध्ये गेहनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मर्दा हिने काही महिन्यांपूर्वी तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. प्रेग्नेंसीच्या शेवटच्या टप्प्यात नेहाच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाल्याचे वृत्त आहे. सध्या तिच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे नेहा
पिंकविलाच्या ताज्या रिपोर्टनुसार, नेहा मर्दाच्या प्रेग्नेंसीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाल्या असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
नेहाला दोन दिवसांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात राहावे लागू शकते. मात्र, आतापर्यंत नेहा किंवा तिच्या कुटुंबीयांकडून याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.
26 जानेवारीला झाला होता डोहाळे जेवणाचा कार्यक्रम
नेहाने 2 महिन्यांपूर्वी तिच्या बेबी शॉवर सेरेमनीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते, ज्यामध्ये ती लव्हेंडर रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती.
सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत नेहाने लिहिले होते, '26-01-2023 रोजी माझा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातील प्रत्येक क्षणावर माझे प्रेम आहे. मला माहित आहे की जेव्हा बाळ या जगात येईल तेव्हा त्याच्यावर खूप प्रेम केले जाईल. आम्ही आमच्या बाळाला पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. ते संस्मरणीय बनवल्याबद्दल माझे कुटुंब आणि सर्वोत्तम मित्रांचे आभार.'
लग्नाच्या 11 वर्षांनंतर आई होणार आहे नेहा
लग्नाच्या 11 वर्षानंतर नेहा आई होणार आहे. हे तिचे पहिले अपत्य आहे. काही महिन्यांपूर्वी नेहाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करून प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. नेहा मर्दाने आयुष्मान अग्रवालसोबत 2012 मध्ये लग्न केले होते.
2005 मध्ये झाली नेहाच्या करिअरची सुरुवात
नेहाने 2005 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ऑलवेज आणि घर एक सपना या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. यानंतर नेहाने देवों के देव महादेव, डोली अरमानो की, लाल इश्क आणि पिया अलबेला या मालिकांमध्ये काम केले. मात्र, लग्नानंतर नेहाने अभिनयापासून दूर झाली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.