आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे कार्डियक अरेस्टमुळे निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. बालिका वधू या गाजलेल्या मालिकेत त्यांनी दादी साची भूमिका साकारली होती. 'बधाई हो' या चित्रपटानंतर सुरेखा यांच्याकडे कोणताही मोठा प्रोजेक्ट नव्हता. म्हणूनच गेल्या वर्षी त्यांनी महाराष्ट्र शासनाने शूटिंगसाठी 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कलाकारांवर घातलेली बंदी हटविण्याची मागणी केली होती.
दोन वर्षांत दोनदा ब्रेन स्ट्रोक
सुरेखा सीकरी या प्रदीर्घ काळापासून आजारी होत्या. 2018 मध्ये महाबळेश्वर येथे एका टीव्ही शोच्या शूटिंगदरम्यान त्यांना ब्रेन स्ट्रोनचा त्रास झाला होता. त्यावेळी त्यांना अर्धांगवायू झाल्याचे वृत्त आले होते. कालांतराने त्या यातून ब-या झाल्या होत्या.
लॉकडाऊनदरम्यान 2020 मध्ये त्यांना पुन्हा ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाला होता. त्यावेळी आयसीयूत त्यांच्यावर उपचार झाले होते. त्यांच्या मेंदुत झालेले ब्लड क्लॉट औषधांनी बरे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.
मदतीबद्दल म्हणाल्या होत्या - मला भीक नकोय
सुरेखा सीकरी यांनी त्यांच्या अडचणीच्या काळाबद्दल सांगताना म्हटले होते की, 'अॅड फिल्मच्या ऑफर माझ्यासाठी पुरेशा नाहीत, मला अधिक काम करावे लागेल. कारण वैद्यकीय बिले वगळता माझे इतरही बरेच खर्च आहेत पण निर्माते कोणतीही रिस्क घेऊ शकत नाहीत. लोकांनी मला आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला, ज्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. पण मी कोणाकडूनही कोणतीही आर्थिक मदत घेतलेली नाही. मला काम द्या. मला सन्मानाने पैसे कमवायचे आहेत.'
50 वर्षांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात घालवला
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.