आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलराज साहनींचे किस्से:तीन महिने तुरुंगात राहून केले होते 'हलचल'चे चित्रीकरण, 'दो बिघा जमीन'मधील पात्रासाठी ओढला होता रिक्षा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1 मे 1913 रोजी रावळपिंडी, पाकिस्तान येथे बलराज साहनी यांचा जन्म झाला होता.

आज आपण भारतीय सिनेजगताच्या त्या कलाकाराविषयी बोलणार आहोत, ज्यांनी ‘हम लोग’, ‘दो बीघा जमीन’, ‘वक्त’ आणि ‘काबुलीवाला’ सारखे चित्रपट दिले. त्यातून चांगला संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तो कलाकार स्टायलिश नव्हता, मात्र अभिनयाने समाजात चांगला संदेश देण्याचा नेहमी प्रयत्न करायचा. लेखक आणि अभिनेते बलराज साहनी यांची 1 मे रोजी जयंती आहे. त्यानिमित्ताने खास वृत्तांत...

दिलीप कुमार यांच्यामुळे मिळाला होता 'हलचल', तीन महिन्यांसाठी गेले होते तुरुंगात
प्रत्येक पात्र जिवंत करण्यासाठी बलराज साहनी खूपच मेहनत घेत होते. 1951 मध्ये आलेल्या ‘हलचल’ मध्ये दिलीप कुमार यांच्या सांगण्यावरुन के आसिफने बलराज यांना जेलरची भूमिका दिली. बलराजदेखील आपल्या भूमिकेविषयी उत्साहित होते. त्यानंतर ते आसिफसोबत आर्थर रोडवरील तुरुंगात गेले. पात्राच्या तयारीसाठी जेलरसोबत काही दिवस राहण्याचे ठरवण्यात आले. दरम्यान एका मिरवणुकीत बलराज सहभागी झाले. तेथे हिंसा भडकवण्यासाठी अनेक लोकांसोबत साहनी यांनादेखील अटक करण्यात आली. ते खरंच तुरुंगात गेले. नंतर एक दिवस के. आसिफ त्यांना भेटायला तुरुंगात गेले, त्यानंतर जेलरने त्यांना ओळखून तुरुंगात राहून शूटिंग करण्याची परवानगी दिली. त्यानंतर साहनी रोज सकाळी चित्रपटाच्या शूटिंगवर जात आणि संध्याकाळी परत येत. तीन महिने त्यांनी तुरुंगात राहून हलचल चित्रपटाची शूटिंग केली होती.

पात्र गरिबाचे आहे तुम्ही सूटबूट घालून आलात ?
‘दो बीघा जमीन’ चित्रपट मिळण्याचादेखील एक मजेदार किस्सा आहे. बिमल रॉयचा हा चित्रपट बलराज यांच्या आधी अशोक कुमार म्हणजेच दादा मुनी करणार होते. त्यांच्या व्यतिरिक्त बिमल यांनी त्रिलोक कपूर आणि नाजिर हुसैन यांचाही विचार केला होता. मात्र बिमल यांनी बलराज यांचा ‘हम लोग’ पाहिला होता त्यामुळे ते बलराज यांनाच घेणार होते. त्यांनी बलराजला बोलावले तर ते सूटाबूटात आले. त्यांना पाहून बिमल गोंधळले कारण ते पात्र रिक्शा चालकाचे होते आणि ते कोणत्याच एंगलने रिक्शा चालक चालवतील असे वाटत नव्हते. तेव्हा बिमल बलराजला म्हणाले..., मिस्टर साहनी तुम्ही पात्रासाठी योग्य ठरणार नाहीत. माझ्या चित्रपटाचे पात्र एक गरीब रिक्शाचालक आहे. त्यानंतर साहनीने बिमल यांना आपला ‘धरती के लाल’ हा चित्रपट पाहण्याची विनंती केली. बिमलने चित्रपट पाहिला त्यानंतर त्यांनी बलराज यांना ती भूमिका दिली.

‘गुडिया'च्या हिरोइनसोबत केले लग्न
1936 मध्ये बलराज यांनी दमयंती साहनीसोबत लग्न केले. त्या ‘गुडिया’चित्रपटात त्यांची हीरोइन होत्या. मात्र कमी वयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या दोन वर्षांनंतर 1947 मध्ये बलराज यांनी संतोष चंदोक यांच्यासोबत लग्न केले. बलराज यांना पोहोण्याची आवड होती. याबरोबरच त्यांना सामाजिक कार्यांचीदेखील आवड होती. कम्युनिस्ट विचारधारेचे बलराज यांना कामगार आणि कष्टकऱ्यांचा कळवळा होता.

बलराज साहनी आणि त्यांचा मुलगा परीक्षित साहनी
बलराज साहनी आणि त्यांचा मुलगा परीक्षित साहनी

मुलाला म्हणाले, माझ्या मागे नव्हे, समोर ओढ सिगारेट
एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत एकदा त्यांचा मुलगा परीक्षित साहनीने सांगितले होते, 'त्यांचे नाते बापलेकांचे नव्हते तर मित्रासारखे होते. त्यांनी मला सांगितले होते, मला वडील समजू नकोस तर मित्र समज. सिगारेट माझ्या मागे का ओढतोस माझ्या समोर ओढ. माझ्यापासून कधीच काहीच लपवू नकोस. त्यानंतर पहिल्यांदाच सिगरेट आणि वाइन आपल्या वडिलांसमोर घेतली. बापलेकाचे असे नाते खूप कमी पाहायला मिळते. ते लोकांवर खूप प्रेम करायचे. मजूर, गरीब लोकांची नेहमी मदत करायचे. त्यांना खोटं आवडत नव्हते, प्रमाणिक आणि स्वाभिमानी होते.'

गांधीजींनी पाठवले होते लंडनला, परतले तर मिळाली चित्रपटात संधी
बलराज साहनी यांचे खरं नाव युधिष्ठिर साहनी होते. भेरा पंजाब आता पाकिस्तन मध्ये मे 1913 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. शिक्षणाची त्यांना चांगलीच आवड होती. त्यामुळे त्यांनी इंग्लिश लिटरेचरमध्ये पदवी मिळवली आणि रविंद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतनमध्ये लेक्चरर म्हणून कामही केले. 1938 मध्ये त्यांनी महात्मा गांधीसोबत मिळून कामही केले. त्यांच्या माध्यमातून ते 1939 मध्ये लंडनला गेले. तेथे चार वर्षे त्यांनी बीबीसीसाठी रेडिओ अनाउंसरचे काम केले. तेथून ते 1943 ला हिंदुस्तानला परतले आणि पीपुल थिएटर असोसिएशन (इप्टा)शी जोडले गेले. येथे त्यांची भेट ख्वाजा अहमद अब्बाससोबत झाली. त्यांनी पुढे जाऊन बलराज साहनी यांना 1946 मध्ये रिलीज झालेल्या ‘धरती के लाल’ चित्रपटात त्यांना अभिनयाची संधी दिली. मात्र बलराज यांना 1951 मध्ये आलेल्या ‘हम लोग’मधून ओळख मिळाली. त्याच्या दोन वर्षानंतर 1953 मध्ये आलेला ‘दो बीघा जमीन’ त्यांच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरला.

काही खास गोष्टी

  • बलराज यांनी ‘बाजी’ सारख्या चित्रपटाचे लेखनदेखील केले.
  • बलराज यांनी मेरा पाकिस्तानी सफराना, एक सफर एक दास्तां आणि गैर जज्बाती डायरी सारखी पुस्तके लिहिली.
  • करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘गरम हवा’ होता. त्याची डबिंग त्यांनी केली होती मात्र ते पाहण्यासाठी ते राहिले नाहीत. 13 एप्रिल 1973 मध्ये त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
  • मुलगा परीक्षितसोबत त्यांनी ‘पवित्र पापी’ आणि ‘हिंदुस्तान की कसम’ सारख्या चित्रपटात काम केले.
  • परीक्षित सहानी यांनी वडिलांवर जेव्हा पुस्तक लिहिले, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी प्रस्तावना लिहिली आणि प्रकाशन कार्यक्रमातही गेले होते.
बातम्या आणखी आहेत...