आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'लक्ष्मी'ची स्पेशल सेंच्युरी:'बम भोले' गाण्यात अक्षय कुमारने 100 ट्रान्सजेंडर्ससोबत केले नृत्य, गणेश आचार्यने केले कोरिओग्राफ

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कपिलच्या शोमध्ये अक्षयने लक्ष्मी यांच्यासोबत चित्रपटाचे प्रमोशनदेखील केले.

अक्षय कुमारच्या आगामी लक्ष्मी या चित्रपटातील 'बम भोले' हे गाणे सगळ्यांच्या पसंतीस पडले आहे. या चित्रपटामध्ये अक्षय ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. नुकतेच या चित्रपटातील बम भोले हे गाणे रिलीज करण्यात आले असून या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात अक्षयने 100 तृतीयपंथीयांसोबत डान्स केला आहे. हे गाणे गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केले आहे.

चित्रपटातील बुर्ज खलिफा हे पहिले गाणे देखील चांगलेच पसंत केले जात आहे. यात अक्षय अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत दिसला आहे.

लक्ष्मीनारायण त्रिपाठी करत आहे चित्रपटाचे प्रमोशन
किन्नर आखाड्याच्या प्रमुख महामंडलेश्‍वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी सुरुवातीपासूनच या चित्रपटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. कपिलच्या शोमध्ये अक्षयने लक्ष्मी यांच्यासोबत चित्रपटाचे प्रमोशनदेखील केले. इतकेच नाही तर लक्ष्मीनारायण अक्षयच्या चित्रपटाचे मार्केटिंगही करत आहेत. दिवाळीपूर्वी प्रदर्शित होत असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना किती भावतो, हे बघावे लागेल.

9 नोव्हेंबरला रिलीज होतोय चित्रपट
चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांना भावले आहेत. सोशल मीडियावर दोघांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट 9 नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉट स्टारवर रिलीज होणार आहे. 2020 मध्ये प्रदर्शित होणारा अक्षय कुमारचा हा पहिला चित्रपट आहे.

अडचणीत सापडला होता चित्रपट
रिलीजपूर्वी हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला होता. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी चित्रपट सोडला होता. याशिवाय चित्रपटाच्या निर्माते शबीना खानबरोबर अक्षयचा मतभेद झाल्याच्या बातम्याही आल्या आहेत. तथापि, चित्रपट निर्मात्यांनी हे सर्व रिपोर्ट फेटाळले आहेत.