आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बमफाड ट्रेलर:परेश रावल यांचा मुलगा आदित्यसोबत दिसली 'अर्जुन रेड्डी' फेम अभिनेत्री शालिनी पांडेची रोमँटिक केमिस्ट्री

भोपाळ3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट 10 एप्रिल रोजी झी 5 प्रीमियमवर प्रदर्शित होईल.

रंजन चंदेल दिग्दर्शित झी 5 चा चित्रपट ‘बमफाड’चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावल 'अर्जुन रेड्डी' फेम अभिनेत्री शालिनी पांडेसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत आहे. हा चित्रपट 10 एप्रिल रोजी झी 5 प्रीमियम या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.

झी 5 च्या इंस्टाग्राम पेजवर चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाल्याची माहिती देण्यात आली.या चित्रपटाचा ट्रेलर पाहून बघता यात प्रेमकथेसोबतच जबरदस्त गुंडगिरी पाहायला मिळणार याचा अंदाज बांधता येतो.

लोकप्रिय अभिनेते परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावल आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री शालिनी पांडे 'बामफड' चित्रपटात मुख्य भूमिकेत रोमांस करताना दिसणार आहे. याशिवाय 'सेक्रेड गेम्स' फेम अभिनेता जतीन सरना आणि अभिनेता विजय वर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका यात आहेत.

  • 'जयेशभाई जोरदार'द्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार होती शालिनी पांडे

यशराज फिल्मने काही महिन्यांपूर्वी 'जयेशभाई जोरदार' चित्रपटाची घोषणा केली होती. ज्यात शालिनी पांडे रणवीर सिंगसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. पण हा चित्रपट पुढे ढकलला गेला आणि आता शालिनीचे 'बमफाड' चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे.

बातम्या आणखी आहेत...