आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री कंगना रनोटच्या अडचणी वाढणार:वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाचे कंगनाविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण आहे तरी काय

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने आपल्या ट्विट आणि न्यूज चॅनल्सवरील वक्तव्यांमधून द्वेष वाढवला आहे.

अभिनेत्री कंगना रनोटच्या अडचणी वाढणार असल्याची चिन्हे आहेत. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने कंगना रनोट विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. वांद्रे न्यायालयात मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी कंगना विरोधात एक याचिका दाखल केली आहे.

आपल्या याचिकेत याचिकाकर्त्यांनी म्हटले की, हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने आपल्या ट्विट आणि न्यूज चॅनल्सवरील वक्तव्यांमधून द्वेष वाढवला आहे. यासंदर्भात आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती.

दरम्यान याप्रकरणी वांद्रा पोलिस ठाण्यात कंगनाविरोधात तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. आता वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचा निर्णय दिला आहे. तिच्याविरोधात भादवी कलम 153(A), 295(A), 124, 34 IPC अंतर्गत FIR दाखल केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...