आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सँडलवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरण:फरार मेहुणा आदित्यच्या शोधात विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांचा छापा; कन्नड चित्रपटसृष्टीतील कलाकारांना ड्रग्ज पुरवल्याचा आहे आरोप

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सँडलवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणात पोलिस विवेकचा मेहुणा आदित्य अल्वाचा शोध घेत आहेत.

अभिनेता विवेक ओबेरॉयच्या मुंबईतील जुहू येथील घरावर बंगळुरू पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला. दुपारी एक वाजता बंगळुरूचे दोन पोलिस निरीक्षक विवेकच्या घरी आले आणि त्यांनी त्याच्या पत्नीची चौकशी केली. सँडलवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणात पोलिस विवेकचा मेहुणा आदित्य अल्वाचा शोध घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना संशय आहे की, विवेकच्या पत्नीने भावाला फरार करण्यात मदत केली आहे. आदित्य हा मागील महिन्याभरापासून फरार आहे.

कन्नड कलाकारांना ड्रग्ज पुरवल्याचा आहे आरोप
आदित्य हा कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांना ड्रग्ज पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदीसह 10 हून अधिक लोकांना अटक केली आहे.

विवेक ओबरॉयचा मेहुणा आदित्य अल्वा
विवेक ओबरॉयचा मेहुणा आदित्य अल्वा

वॉरंट घेऊन पोलिस अभिनेत्याच्या घरी पोहोचले
पोलिस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'आदित्य अल्वा हा सँडलवूड ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी आहे. तो विवेक ओबरॉयच्या घरी लपल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी हा छापा टाकण्यात आला. या प्रकरणात कोर्टाकडून वॉरंट घेण्यात आले आहे. चौकशीसाठी क्राइम ब्रांचची एक टीम बंगळूरहून मुंबईला पोहोचली आहे.'

यांना झाली आहे अटक
याप्रकरणी रागिनीला 4 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर तिची पहिल्यांदा डोप टेस्ट झाली. रागिणीशिवाय कन्नड अभिनेत्री संजना गलराणी हिलादेखील अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...