आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणीतील बप्पी लहरी:बाप्पा लहरींनी दिला वडिलांच्या आठवणींना उजाळा, म्हणाले - ते आता आमच्यात नाहीत हे सत्य मला अजूनही पचवता आलेले नाही

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ह्रदयविकाराच्या झटक्याने वडिलांचे निधन झाले, असे बाप्पा यांना वाटते

बॉलिवूडचे संगीत दिग्दर्शक बप्पी लहरी यांचे 15 फेब्रुवारी रोजी वयाच्या 69 व्या निधन झाले. अलीकडेच बप्पी लहरी यांचा मुलगा बाप्पा यांनी एका मुलाखतीत वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितल्यानुसार, त्यांच्या वडिलांचा मृत्यू श्वसनाच्या त्रासामुळे झाला असे त्यांना वाटत नाही. सोबतच आपले वडील या जगात नाहीत ही गोष्ट आपण अजूनही पचवू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

ह्रदयविकाराच्या झटक्याने वडिलांचे निधन झाले, असे बाप्पा यांना वाटते
बाप्पा म्हणाले, "नाही, त्यांना श्वसनाचा त्रास नव्हता. मला वाटतं त्यांच्या हृदयाची धडधड थांबली होती. त्यांना श्वास घेण्यास अजिबात त्रास होत नव्हता. त्या रात्री त्यांची तब्येत बिघडली तेव्हा घरच्यांनी डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी सांगितले की त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे. माझी बहीण, माझे मेहुणे आणि माझ्या आईने त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेले. ते हॉस्पिटलमध्ये पोहोचला, पण आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही."

बाप्पा यांनी दिला वडिलांच्या आठवणींना उजाळा
आपल्या वडिलांचे स्मरण करताना बाप्पा म्हणाले, "पप्पा हॉस्पिटलमध्ये असतानाही त्यांनी संगीत सोडले नाही. ते त्यांच्या बेडजवळ असलेला टेबल वाजवायचे. एके दिवशी त्यांनी हॉस्पिटलमध्ये मोठ्याने गाणे सुरू केले. तेव्हा माझी आई त्यांना म्हणाली होती, ' तुम्ही हे काय करत आहात?'"

शेवटच्या क्षणी बप्पी दा लताजींना खूप मिस करायचे
बाप्पा पुढे म्हणाले, "मी त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये सतत फोनवर त्याच्याशी संपर्कात होतो. ते आता आपल्यात नाही हे सत्य मला अजूनही पचनी पडत नाही. माझा अजूनही यावर विश्वास बसत नाहीये. मी त्यांच्यासोबत अनेक शो करायचो. त्यांच्यासोबतच्या माझ्या अनेक आठवणी आहेत. लताजींच्या निधनाने माझ्या वडिलांना खूप मोठा धक्का बसला होता. ते त्यांना माँ म्हणून हाक मारायचे. लताजींनी पप्पांना खूप मदत केली होती."

बप्पी दा 29 दिवस रुग्णालयात दाखल होते

बप्पी दा यांच्यावर 29 दिवस जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. यानंतर 15 फेब्रुवारीला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, घरी आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना गंभीर अवस्थेत जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात आणण्यात आले आणि रात्री 11:45 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

बातम्या आणखी आहेत...