आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bappi Da No More: Bappi Da Used To Wear Gold Inspired By American Pop Star Elvis, Owned Property Worth 20 Crores And Jewelery Worth 40 Lakhs

अलविदा बप्पी दा:संघर्षाच्या दिवसांत अमेरिकन पॉप स्टार एल्विस प्रेसलीकडून घेतली होती सोनं घालण्याची प्रेरणा, 20 कोटींची मालमत्ता आणि 40 लाखांच्या दागिन्यांचे होते मालक

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बप्पी दा यांना डिस्को गाण्यांचा बादशाह म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचे मंगळवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास निधन झाले आहे. वयाच्या 69 व्या वर्षी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनोखी गाणी आणि सोन्याच्या दागिन्यांची आवड यामुळे त्यांची खास ओळख होती. त्यांच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया-

27 नोव्हेंबर 1952 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या बप्पी यांचा लहानपणापासूनच संगीताकडे कल होता. वयाच्या अवघ्या तिसर्‍या वर्षापासून ते तबला वाजवायला शिकले. बप्पी दा यांना डिस्को गाण्यांचा बादशाह म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

संघर्षाच्या दिवसांत एल्विस प्रेसलीकडून मिळाली होती प्रेरणा

बप्पी दांचे खरे नाव आलोकेश लहरी होते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये डिस्को म्यूझिकचा ट्रेंड आणण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. डिस्को म्युझिकसोबतच खुप जास्त सोने घालणे आणि नेहमी गॉगल्स घालणेही बप्पी यांची ओळख आहे. बप्पी दा यांनी आपल्या एका जुन्या मुलाखतीत ते एवढे सोने का घालतात यामागचे कारण सांगितले होते. ते म्हणाले होते, "हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता एल्विस प्रेसली हा माझा आवडता कलाकार असून तो कायम सोन्याची चेन घालतो. त्याला पाहून मला कायम प्रेरणा मिळत राहिली. इतकेच नाही तर, जर मी जीवनात यशस्वी झालो तर माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करेन असे ठरवले होते. त्यातच मला असे वाटते की सोनं माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळेच मी कायम सोनं घालतो आणि त्यामुळेच गाण्यासोबत माझी वेगळी ओळखही झाली आहे."

बप्पी लहरी यांच्याजवळ किती आहे सोने-चांदी?
2014 च्या निवडणूकीदरम्यान बप्पी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता आणि पश्चिम बंगालच्या श्रीरामपुरमधून त्यांना तिकीट देण्यात आले होते. त्यावेळी त्याने आपल्याकडील सोने चांदी किती आहे ते जाहिर केले होते. त्यांच्याजवळ 754 ग्रॅम सोने आणि 4.62 किलो चांदी होती. हे त्यांनी सहा वर्षांपूर्वी सांगितले होते.

40 लाख रुपये आहे बप्पी दांकडे असलेल्या सोन्याचांदीची किंमत
2014 च्या निवडणुकीच्या काळात त्यांनी आपली संपत्ती जाहिर केली होती. निवडणुकी दरम्यान दिल्या गेलेल्या एफिडेविटनुसार, बप्पी दांकडे 754 ग्रॅम सोने आणि 4.62 किलो चांदी होती. त्याकाळानुसार, त्यांच्याजवळ 40 लाखांचे सोने होते. बप्पी लहिरी मुंबईत 2001 मध्ये खरेदी केलेल्या घरात वास्तव्याला होते. त्यांच्या घराची किंमत सुमारे 3.5 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे BMW, Audi, Tesla X आणि आणखी काही लक्झरी कार आहेत.

पत्नी चित्राणीजवळ बप्पी दांपेक्षा अधिक सोने
बप्पी दांच्या पत्नी चित्राणी यादेखील सोने आणि डायमंडच्या शौकीन आहेत. 2014 मध्ये बप्पी दांनी सांगितल्यानुसार, त्यांच्या पत्नीजवळ 967 ग्रॅम सोन्याचे दागिने, 8.9 किलो चांदी आणि चार लाखांचे हीरे होते. यासोबतच बप्पी यांनी आपल्या घरात हिट गाण्याच्या आठवणीत गोल्ड प्लेटेड डिस्क लावली आहे. त्यांची एकुण संपत्ती 20 कोटी रुपये असल्याचे त्यांनी जाहिर केले होते.

बातम्या आणखी आहेत...