आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बप्पी दा पंचत्वात विलीन:मुलगा बाप्पाने दिला बप्पी लहरी यांच्या पार्थिवाला अग्नी; शक्ती कपूर, विद्या बालन, मिका सिंग यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी दिला अखेरचा निरोप

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बप्पी दा यांचे मंगळवारी (15 फेब्रुवारी) रात्री 11.45 वाजता वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले.

ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहरी आता आपल्यात नाहीत. गुरुवारी विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा बाप्पा लहरी यांनी त्यांच्या पार्थिवाला यांनी मुखाग्नी दिला. यावेळी शक्ती कपूर, विद्या बालन, मिका सिंग, बिंदू दारा सिंग, उदित नारायण, शान, अभिजित भट्टाचार्य, अलका याज्ञिक, इला अरुण, भूषण कुमार, निखिल द्विवेदी, बी. सुभाष, रुपाली गांगुली, सुनील पाल यांच्यासह अनेक सेलिब्रिटी स्मशानभूमीत उपस्थित होते.

मिका सिंग आणि बिंदू दारा सिंग बप्पी दा यांच्या अंत्यदर्शनासाठी स्मशानभूमीत पोहोचले.
मिका सिंग आणि बिंदू दारा सिंग बप्पी दा यांच्या अंत्यदर्शनासाठी स्मशानभूमीत पोहोचले.
विघा बालनही बप्पी दांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचली होती.
विघा बालनही बप्पी दांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचली होती.
वडील बप्पी लहरी यांना मुलगा बाप्पाने अग्नी दिला.
वडील बप्पी लहरी यांना मुलगा बाप्पाने अग्नी दिला.
बप्पी दांचा शोकाकूल मुलगा बाप्पा लहरी
बप्पी दांचा शोकाकूल मुलगा बाप्पा लहरी
विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत बप्पी दांचे पार्थिव पोहोचले.
विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत बप्पी दांचे पार्थिव पोहोचले.

बप्पी दा यांचे मंगळवारी (15 फेब्रुवारी) रात्री 11.45 वाजता वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. परंतु, त्यांचा मुलगा बाप्पा लहरी अमेरिकेत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार होऊ शकले नाहीत, बाप्पा लहरी रात्री उशिरा मुंबईत दाखल झाला.

बप्पी लहरी यांची मुलगी रीमा त्यांच्या खूप जवळची होती आणि अखेरच्या क्षणी ती त्यांच्यासोबत होती.
बप्पी लहरी यांची मुलगी रीमा त्यांच्या खूप जवळची होती आणि अखेरच्या क्षणी ती त्यांच्यासोबत होती.

मुलगी रीमाच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला
बप्पी लहरी यांनी मुंबईतील जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. बप्पी दा यांनी आपली मुलगी रीमा हिच्या कुशीत अखेरचा श्वास घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांची मुलगी रीमाचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती घरात वडिलांच्या पार्थिवाजवळ रडताना दिसत आहे. तिचे कुटुंबीय तिची काळजी घेताना दिसत आहेत.

इला अरुण बप्पी दांच्या शेवटच्या दर्शनाला पोहोचल्या होत्या.
इला अरुण बप्पी दांच्या शेवटच्या दर्शनाला पोहोचल्या होत्या.
पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाली.
पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाली.
अखेरच्या प्रवासाला निघाले बप्पी लहरी
अखेरच्या प्रवासाला निघाले बप्पी लहरी
बप्पी दांचे पार्थिव त्यांच्या घरातून पवन हंस स्मशानभूमीत घेऊन जाताना बप्पी दांचे नातेवाईक.
बप्पी दांचे पार्थिव त्यांच्या घरातून पवन हंस स्मशानभूमीत घेऊन जाताना बप्पी दांचे नातेवाईक.
बप्पी लहरी यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबातील सदस्य आणि सेलिब्रिटी
बप्पी लहरी यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबातील सदस्य आणि सेलिब्रिटी

OSA आजारामुळे झाला मृत्यू
बप्पी लहरी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामुळे (Obstructive Sleep Apnea) बप्पीदांचे निधनझाले. OSA ही एक गंभीर व्याधी आहे. त्यात व्यक्तीचा झोपेतच श्वास थांबतो आणि व्यक्ती दगावते. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया अर्थात OSA हा एक प्रकारचा आजार आहे. अपूर्ण झोप झाल्यामुळे हा आजार होतो. बप्पीदांना देखील याच आजाराने ग्रासले होते. OSA असलेल्या व्यक्ती झोपेत असताना त्याला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. रक्तातील ऑक्सिजन लेव्हल देखील झपाट्याने कमी होते. यामुळे वजनही वाढते. झापेच श्वास थांबल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो, अशी माहिती डॉ. दीपक नामजोशी यांनी दिली.

बप्पी दांना अखेरचा निरोप देण्यासाठी सेलिब्रिटी घरी पोहोचले
निधनानंतर बप्पी लहरी यांचे पार्थिव रुग्णालयातून घरी आणण्यात आले. काजोल आणि तिची आई तनुजा, अलका याज्ञिक, राकेश रोशन, शान, चंकी पांडे, अभिजित भट्टाचार्य, मौसमी चॅटर्जी, नितीन मुकेश, पद्मिनी कोल्हापुरे, इला अरुण, नीतू चंद्रा, शिवांगी कपूर, राज मुखर्जी, बिस्वजीत चॅटर्जी, नीतू चंद्रा, ललित पंडित, साधना सरगम, सुनील पाल, विजेता पंडित, पूनम ढिल्लन, केके गोस्वामी, शरबानी मुखर्जी, साक्षी तंवर आणि सलमा आगा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी त्यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दीही होती.

बप्पी दा यांनी 5000 गाणी रचली
बप्पी दांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी कोलकाता येथे झाला. आपल्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. बप्पी दांची इंडस्ट्रीत 48 वर्षांची कारकीर्द होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास 5,000 गाणी संगीतबद्ध केली. यामध्ये त्यांनी हिंदी, बंगाली, तामिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, गुजराती, मराठी, पंजाबी, ओरिया, भोजपुरी, आसामी भाषा तसेच बांग्लादेशी चित्रपट आणि इंग्रजी गाणी रचली.

बातम्या आणखी आहेत...