आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बप्पी दांचा मृत्यू कसा झाला?:बप्पी लहरी यांचे जावई गोविंद बन्सल यांनी सांगितली त्या रात्रीची संपूर्ण कहाणी, म्हणाले - जेवणाच्या अर्ध्या तासानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेवण केल्यानंतर अर्ध्या तासाने बप्पी दा यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहरी आता या जगात नाहीत. गुरुवारी विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा बाप्पा लहरी यांनी त्यांना अग्नी दिला. यावेळी स्मशानभूमीत त्यांचे कुटुंबीय आणि अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. बप्पी दा यांचे वयाच्या 69 व्या वर्षी 15 फेब्रुवारी रोजी रात्री 11.45 वाजता निधन झाले. दरम्यान, बप्पी लहरी यांचे जावई गोविंद बन्सल यांनी मंगळवारी रात्रीची संपूर्ण कहाणी सांगितली. रात्री जेवल्यानंतर बप्पी दादांना हृदयविकाराचा झटका आल्याचेही त्यांनी सांगितले.

जेवण केल्यानंतर अर्ध्या तासाने बप्पी दा यांना हृदयविकाराचा झटका आला
बप्पी लहरी यांची मुलगी रीमा हिचे पती गोविंद बन्सल म्हणाले, "ते तीन आठवडे रुग्णालयात दाखल होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ते घरी आले होते. मंगळवारी रात्री 8.30 - 9.00 च्या सुमारास त्यांनी रात्रीचे जेवण केले. जेवणानंतर साधारण अर्ध्या तासाने बप्पी दादांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या नाडीचा वेग खूपच कमी होऊ लागला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे रात्री 11.45 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले."

दादांनी आपल्या गाण्यांनी संपूर्ण जगाचे मनोरंजन केले
गोविंद पुढे म्हणाले की, 'ही वेळ आमच्या कुटुंबासाठी आणि सर्वांसाठी खूप दुःखाची आहे. दादांनी आपल्या गाण्यांनी अवघ्या जगाचे मनोरंजन केले आहे. सगळ्यांचे त्यांच्यावर खूप प्रेम होते.' बप्पी दा यांचा मुलगा बाप्पा अमेरिकेत असल्याने बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकले नव्हते. बुधवारी रात्री बाप्पा अमेरिकेहून मुंबईत दाखल झाला. त्यानंतर आज (गुरुवारी) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुलगी रीमाच्या कुशीत बप्पी दांनी घेतला अखेरचा श्वास
बप्पी लाहिरी यांनी मुंबईतील जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. बप्पी दा यांची त्यांची मुलगी रीमा हिच्या कुशीतच प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामुळे (Obstructive Sleep Apnea) बप्पीदांचे निधन झाले. OSA ही एक गंभीर व्याधी आहे. त्यात व्यक्तीचा झोपेतच श्वास थांबतो आणि व्यक्ती दगावते. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया अर्थात OSA हा एक प्रकारचा आजार आहे. अपूर्ण झोप झाल्यामुळे हा आजार होतो. बप्पीदांना देखील याच आजाराने ग्रासले होते. OSA असलेल्या व्यक्ती झोपेत असताना त्याला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. रक्तातील ऑक्सिजन लेव्हल देखील झपाट्याने कमी होते. यामुळे वजनही वाढते. झापेच श्वास थांबल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो, अशी माहिती डॉ. दीपक नामजोशी यांनी दिली होती.

बप्पी दा यांनी 5000 गाणी रचली
बप्पी लहरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी कोलकाता येथे झाला. आपल्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. बप्पी यांची इंडस्ट्रीत 48 वर्षांची कारकीर्द होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास 5,000 गाणी संगीतबद्ध केली. यामध्ये त्यांनी हिंदी, बंगाली, तामिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, गुजराती, मराठी, पंजाबी, ओरिया, भोजपुरी, आसामी भाषा तसेच बांग्लादेशी चित्रपट आणि इंग्रजी गाणी कंपोज केली होती.

बातम्या आणखी आहेत...