आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलविदा बासू दा:अनंतात विलीन झाले प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चटर्जी, अंत्यसंस्काराला फक्त 10 जणांची उपस्थिती 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सांताक्रूजच्या स्मशानभूमीत बासू चटर्जी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे गुरुवारी सकाळी 8.30 वाजता निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी दुपारी  सांताक्रूझ स्मशानभूमीत बासू दा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मुंबईत लॉकडाऊन आहे आणि निसर्ग वादळामुळे तुफान पाऊस  होता. त्यामुळे  त्यांच्या अंत्यविधीला केवळ 10 जणच उपस्थित राहू शकले. IFTDAचे अशोक पंडित आणि संदीप सिकंद त्यांना अखेरचा निरोप द्यायला उपस्थित होते तर कुटुंबातून पिंटू गुहा हजर होते. 

अंत्यसंस्कारादरम्यान कुटुंबातील केवळ 10 लोक उपस्थित होते. यात त्यांची मुलगी आणि जावयाचा समावेश होता.  

इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे (आयएफटीडीए) अध्यक्ष अशोक पंडित म्हणाले- त्यांनी सकाळी झोपेतच अखेरचा श्वास घेतला. फिल्म इंडस्ट्रीचे हे खूप मोठे नुकसान आहे. वृत्तानुसार, त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता आणि ते ब-याच काळापासून आजारी होते.

बातम्या आणखी आहेत...