आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आठवणी:चित्रपटसृष्टीत उशीराने आलेल्या बासू चटर्जी यांनी असिस्टंट म्हणून केली होती सुरुवात, कर्ज काढून बनवला होता पहिला चित्रपट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वयाची तिशी ओलांडल्यानंतर बासू चटर्जी चित्रपटसृष्टीत आले होते.

वयाच्या 90 व्या वर्षी या जगाचा निरोप घेणारे प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चटर्जी यांना रोमँटिक चित्रपटांचा देव म्हटले जात होते.  स्वतःच्या वेगळ्या शैलीत चित्रपट बनवणारे ते पहिले फिल्ममेकर होते. पण त्यासाठी बासू दा यांनी कोणताही चित्रपटाचा अभ्यासक्रम केला नाही. कारण त्यावेळी असे इन्स्टिट्यूट नव्हते. इतकेच नाही तर चित्रपटांमधील त्यांचा प्रवेशही खूप उशीराने झाला होता. 

सहाय्यक म्हणून केली होती सुरुवात 

एका मुलाखतीत बासू दा म्हणाले होते, "मी चित्रपटसृष्टीत खूप उशीराने आलो. त्यावेळी मी वयाची तिशी ओलांडली होती." बासू यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी चित्रपट निर्माता बासू भट्टाचार्य यांचे मुख्य सहाय्यक म्हणून काम सुरू केले आणि राज कपूर - वहीदा रहमान स्टारर 'तीसरी कसम' या चित्रपटात त्यांना असिस्ट केले होते.

चॅटर्जी म्हणाले होते की, "मी दोन चित्रपटांत सहाय्यक म्हणून काम केले होते. पण काही वेगळे करण्याचे माझे लक्ष्य होते. त्यावेळी मी व्यंगचित्रकार म्हणून काम करत असल्याने मला रोजीरोटीची अडचण नव्हती. चित्रपट बनवण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळावे यासाठी मी सहाय्यक म्हणून काम केले होते."

समांतर हिंदी सिनेमाच्या सुरुवातीस महत्त्वपूर्ण योगदान

चटर्जी यांनी 'सारा आकाश' हा पहिला चित्रपट बनवला होता. 'सारा आकाश', मणि कौल यांचा 'उसकी रोटी' आणि मृणाल सेन यांचा 'भुवन शोम' या चित्रपटांकडे 1969-70 च्या दशकात समांतर हिंदी सिनेमाची सुरुवात म्हणून पाहिले जाते. चटर्जी यांच्या म्हणण्यानुसार, "साहजिकच त्यावेळी लोकांना समांतर सिनेमाबद्दल माहिती नव्हतं. आम्ही तसेच चित्रपट बनवले जसे आम्हाला ते बनवायचे होते."

'सारा आकाश'मध्ये एकही स्टुडिओ शॉट नव्हता

चटर्जी म्हणाले होते, "सारा आकाश'मध्ये एकही शॉट स्टुडिओचा नव्हता. सर्व रिअल लोकेशन होते, ज्यामुळे चित्रपटात फ्रेशनेस जाणवला. आम्ही लहान-मोठ्या फिल्ममेकर्सचे कौतुक करत मोठे झालो. आम्ही हॉलिवूडमधून प्रेरणा घेतली नाही. मणी कौल यांनी 'सारा आकाश' मध्ये काम केले होते आणि त्यासाठी त्यांनी 300 रुपये घेतले होते."

कर्ज काढून 'सारा आकाश' बनवला होता

एका रिपोर्टनुसार, त्याकाळी फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन वेगळ्या धाटणीचे चित्रपट करण्यासाठी कर्ज देत होती. त्यामुळे चटर्जी यांना 'सारा आकाश'साठी कर्जही मिळाले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी लगेच ते कर्जही फेडले होते. 

अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी टीव्हीकडे वळले होते 

चटर्जी यांनी छोट्या पडद्यावर 'रजनी', 'दर्पण' आणि 'व्योमकेश बक्षी' यासारख्या मालिकादेखील दिल्या. पण प्रत्यक्षात ते फक्त जास्तीचे पैसे मिळविण्याच्या उद्देशाने येथे आले होते. याची कबुली देत ​​ते एका मुलाखतीत म्हणाले होते, "दूरदर्शन त्यावेळी नवीन होते आणि सरकार एअर टाइम पूर्ण करण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीशी जुळण्यास उत्सुक होते. सामाजिक मूल्य असलेल्या गोष्टी तयार करण्यासाठी त्यांनी अनेक चित्रपट निर्मात्यांकडे संपर्क साधला."

चटर्जी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ही संधी हातून जाऊ दिली नाही. पण जेव्हा त्यांची पहिली मालिका 'रजनी' हिट ठरली तेव्हा त्यांना समजले की, छोटा पडदा केवळ जास्तीचे पैसे मिळवण्याचे साधन नाही. उलट ही पूर्णवेळ नोकरी आहे. व्यंगचित्रकार असल्यामुळे ते देशातील सामाजिक प्रश्नांशी परिचित होते. यातील काही मुद्दे त्यांनी 'रजनी' च्या माध्यमातून दाखवले.

0