आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोशन पोस्टर:'बीट्स ऑफ राधे श्याम' : पोर्तुगीज ट्रॅव्हल ब्लॉगर्स रकील-मिगुएलच्या वादग्रस्त छायाचित्रावरुन प्रेरित आहे प्रभास-पूजाचा हा ट्रेन सीन

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या फोटोसाठी रकील आणि मिगुएल यांना ब-याच टीकेचा सामना करावा लागला होता. एला टाऊनमधील पुलावरुन कमी वेगाने ट्रेन जात असताना हा फोटो क्लिक करण्यात आला होता.

साऊथचा सुपरस्टार प्रभासचा आज वाढदिवस असून या खास दिवशी त्याच्या आगामी 'राधे श्याम' या चित्रपटाचे मोशन पोस्टर 'बीट्स ऑफ राधे श्याम' रिलीज करण्यात आले आहे. पोस्टरच्या सुरूवातीला, रेल्वेचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ज्याच्या प्रत्येक बोगीतून एक वेगळी प्रेमकथा दर्शवली गेली. पहिल्या बोगीत रोमियो-ज्युलियट, दुस-यात सलीम-अनारकली आणि तिस-या बोगीत देवदास-पारो दिसतात. शेवटी विक्रमादित्य आणि प्रेरणा यांना दाखवले गेले आहे. राधे श्याम हा चित्रपट 5 भाषांमध्ये बनत आहे.

मोशन पोस्टर रिलीज झाल्यानंतर याची तुलना हॅरी पोर्टर सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या हॉगवर्ट्स एक्स्प्रेस आणि पोर्तुगालचे ट्रॅव्हल ब्लॉगर्स रकील आणि मिगुएल यांच्या व्हायरल फोटोशी केली जात आहे.

पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे 'राधे श्याम'
चित्रपटाचे दिग्दर्शन राधाकृष्ण कुमार करत आहेत. 'राधे श्याम'मध्ये सचिन खेडेकर, प्रियदर्शी पुलिकोंडा, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर, रिद्धी कुमार, साशा क्षेत्री, सत्यन यांच्या भूमिका आहेत. जानेवारी 2020 पासून चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. जॉर्जिया, इटली, युरोपमध्ये चित्रीकरण करण्यात आले. चित्रपटात प्रभास संगीत शिक्षकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.