आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायक जुबिन नौटियाल वादात:वयाच्या 18 व्या वर्षी डेहराडूनमध्ये झाला प्रसिद्ध, दोन शोमध्ये रिजेक्ट झाला पण पहिलेच गाणे ठरेल हिट

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुबिन नौटियाल सध्या चर्चेत आहे. ज्याचे कारण म्हणजे तो एक शो करणार असल्याची चर्चा आहे, जो भारतातील वाँटेड गुन्हेगार जयसिंग आयोजित करत आहे. यासाठी जुबिनला खूप ट्रोल केले जात आहे. #ArrestJubinNautyal असा हॅशटॅग शनिवारपासून ट्विटरवर ट्रेंड करत आहे.अमेरिकेत होणाऱ्या जुबिनच्या लाइव्ह कॉन्सर्टचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टरबाबत दावा केला जात आहे की, कॉन्सर्टचा आयोजक जयसिंग हा भारताचा वाँटेड गुन्हेगार आहे. काही युजर्स म्हणत आहेत की, हा जयसिंग नसून रेहान सिद्दीकी आहे. तर काहींनी जयसिंगवर खलिस्तानचं समर्थन केल्याचा आरोप केला आहे. आता जुबिन नौटियाल याने ट्विट करून लोकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले आहे. ‘हॅलो फ्रेंड्स आणि ट्विटर फॅमिली. पुढच्या महिन्यात मी प्रवास आणि शूटिंगमध्ये व्यस्त असेन. कोणत्याही प्रकारच्या अफवांमुळे निराश होऊ नका. माझे देशावर प्रेम आहे. मी तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो’, असे ट्विट त्याने केले आहे.

आज आम्ही तुम्हाला जुबिनचा आतापर्यंतचा प्रवास सांगणार आहोत. वयाच्या 18 व्या वर्षी डेहराडूनमध्ये गायन क्षेत्रात त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. पण इथवर पोहोचण्यासाठी त्यालादेखील खूप संघर्ष करावा लागला आहे. चला तर मग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याचा आतापर्यंतचा प्रवास.

बातम्या आणखी आहेत...