आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओशोवरील चित्रपट:आमिर खानपूर्वी रवी किशनने मारली बाजी,  'सीक्रेट्स ऑफ लव्ह'मध्ये झळकणार आध्यात्मिक गुरू ओशो रजनीशच्या भूमिकेत

किरण जैनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रवी किशन 'सीक्रेट्स ऑफ लव्ह' मध्ये पडद्यावर ओशो रजनीशच्या भूमिकेत दिसणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये अध्यात्मिक गुरु ओशो रजनीश यांच्यावर जीवनावर आधारित चित्रपट बनणार असल्याची चर्चा जोरात सुरू होती. दिग्दर्शक शकुन बत्रा या चित्रपटाची योजना आखत होते, तर निर्मिती करण जोहर करणार होता. या चित्रपटात आमिर खान आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असल्याची चर्चा देखील झाली होती. परंतु, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, रवी किशनने यात बाजी मारलेली दिसतेय.

आमिर खानच्या आधी रवी किशन आता वेलजी भाई गाला निर्मित 'सीक्रेट्स ऑफ लव्ह' मध्ये पडद्यावर ओशो रजनीशच्या भूमिकेत दिसणार आहे.

ओशोंचे शिष्य वेलजीभाई गाला यांनी बनवला चित्रपट
दिव्य मराठीकडे या वृत्ताला दुजोरा देताना वेलजीभाई म्हणतात, "गेली 30 वर्षे मी ओशोंचा शिष्य आहे आणि मला शक्य तितक्या लवकर त्यांची कहाणी लोकांपर्यंत पोहचवायची होती. बर्‍याच विचारानंतर त्यांची कहाणी चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता येईल, असे मला वाटले. म्हणून मी हा निर्णय घेतला. मी त्यांचे अनेक प्रवचन ऐकले आहेत, त्यांनी सांगितलेली ध्यानधारणा केली आहे. मला त्याच्याशी संबंधित प्रत्येक छोट्या गोष्टीची जाणीव आहे, म्हणून चित्रपट तयार करण्यात मला फारशी अडचण नव्हती. ओशो या शतकातील सर्वोत्कृष्ट व्यक्ती आहेत आणि या शतकाच्या लोकांना त्याच्याबद्दल माहित असले पाहिजे," असे त्यांनी सांगितले.

रवी किशनपेक्षा दुसरा चांगला पर्याय नव्हता
रवी किशनविषयी वेलजीभाई म्हणतात, "या चित्रपटात आम्ही ओशोशी संबंधित तीन मोठे टप्पे दाखवणार आहोत, ज्यासाठी तीन वेगवेगळ्या कलाकारांना घेण्यात आले आहे. जयेश कपूर, विवेक मिश्रा आणि रवि किशन यांनी या भूमिका साकारल्या आहेत. जेव्हा ओशो रजनीश अमेरिकेत गेले होते तेथे त्यांना विषबाधा झाली होती, रवी किशन त्या व्यक्तिरेखेमध्ये दिसणार आहे. रवीला साइन करण्यापूर्वी आम्ही काही कलाकारांच्या लूक टेस्ट केल्या, मात्र ओशोच्या व्यक्तिरेखेत रवीपेक्षा इतर कुणीही फिट बसले नाही."

एप्रिल ते मे 2021 दरम्यान रिलीज होईल चित्रपट
निर्माते हा चित्रपट मागील वर्षी रिलीज करणार होते, मात्र कोरोनामुळे त्यांना त्यांच्या योजनेत बदल करावा लागला. ते म्हणतात, "आम्ही जवळपास दीड वर्षांपासून या चित्रपटावर काम करत आहोत. लॉकडाउनमुळे जवळजवळ 7 ते 8 महिने वाया गेले. 2020 मध्ये आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करणार होतो. बहुतेक शूटिंग पूर्ण झाले आहे. आणि आता एप्रिल ते मे 2021 दरम्यान चित्रपट रिलीज होईल."

कॉपीराइटमुळे चित्रपटाच्या शीर्षकात ओशोंच्या नावाचा उल्लेख नाही
बातचीत दरम्यान वेलजीभाईंनी सांगितले की, कॉपीराइटमुळे त्यांनी ओशोचे नाव चित्रपटाच्या शीर्षकात नमूद केलेले नाही. या चित्रपटाचे चित्रीकरण काशी, गुजरात, गोवा, जबलपूर आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये केले गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...