आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडिया:'हाफ गर्लफ्रेंड'साठी अर्जुन कपूरपूर्वी झाली होती सुशांत सिंह राजपूतची निवड, चेतन भगतची जुनी पोस्ट व्हायरल 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'फितूर', 'बेफिक्रे' आणि 'हाफ गर्लफ्रेंड' यांचा चित्रपटांतून सुशांतला काढून टाकण्यात आले होते.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही आणि गटबाजी केल्याचा मुद्दा चर्चेत आहे. चित्रपटातून वारंवार काढून टाकल्याने सुशांतला नैराश्याने ग्रासले होते, त्यामुळेच त्याने आत्महत्याची केल्याची चर्चा सुरु आहे. आता चेतन भगत यांची एक जुनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नेटकरी अर्जुन कपूर आणि घराणेशाहीवर टीका करत आहेत. 'हाफ गर्लफ्रेंड' या चित्रपटासाठी अर्जुनपूर्वी सुशांतची निवड झाली होती, अशा आशयाची चेतन भगत यांची पोस्ट आहे. 

2017 मध्ये रिलीज झालेल्या 'हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चेतन भगत यांच्या पुस्तकावर हाफ गर्लफ्रेंड हा चित्रपट बनला होता. मोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी सुशांत सिंह राजपूतची निवड झाली, असे ट्विट चेतन भगत यांनी 2015 मध्ये केले होते. पण नंतर सुशांतची जागा अर्जुन कपूरने का घेतली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही.  

ही पोस्ट समोर येताच सुशांतच्या चाहत्यांनी आणि ट्रोलर्सनी अर्जुन कपूलवर निशाणा साधला आहे. नेटक-यांच्या मते, तो स्टारकिड  असल्याने त्याला सतत चित्रपट मिळतात. एका नेटक-याने नाराजी व्यक्त करत लिहिले की, 'हाफ गर्लफ्रेंड मधून सुशांतसारख्या चांगल्या अभिनेत्याला काढून नेपोटिज्मच्या वाईट प्रॉडक्टला घेण्यात आले. 

एका नेटक-याने लिहिले की, 'स्ट्रगलिंग कलाकारांना अव्वल अभिनेता होण्यासाठी कौशल्य दाखवावे लागते आणि स्टारकिड्स फक्त वजन कमी करतात'.

  • तीन चित्रपटांमधून केले गेले रिप्लेस

नेटक-यांनी काही जुन्या पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्यात सुशांतला चित्रपटांतून काढून टाकण्यात आल्याच्या बातम्या आहेत.  'फितूर', 'बेफिक्रे' आणि 'हाफ गर्लफ्रेंड' यांचा चित्रपटांतून त्याला काढून टाकण्यात आले होते.   

बातम्या आणखी आहेत...