आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्थडे स्पेशल:स्क्रिप्ट रायटर होण्यापूर्वी चित्रपटांमध्ये केले होते सलीम खान यांनी काम, पत्नी हेलनसोबत झळकले होते

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'तीसरी मंजिल'पूर्वी सलीम खान 1962 मध्ये आलेल्या 'प्रोफेसर' या चित्रपटात झळकले होते.

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचे वडील आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध स्क्रिप्ट आणि डायलॉग रायटर सलीम खान यांचा आज (24 नोव्हेंबर) वाढदिवस असून त्यांनी वयाची 85 वर्षे पूर्ण केली आहेत. सलीम खान यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1935 रोजी इंदूर येथे झाला. त्यांचे वडील पोलिसांत होते. सलीम खान यांनी जावेद अख्तर यांच्यासोबत मिळून गाजलेल्या 'शोले' या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली होती. विशेष म्हणजे स्क्रिप्ट रायटर होण्यापूर्वी त्यांनी एका थ्रिलर चित्रपटात अभिनय केला होता. 1966 मध्ये आलेल्या तीसरी मंजिल या चित्रपटात ते झळकले होते. इतकेच नाही तर यात त्यांनी हेलन यांच्यासोबत काम केले होते. त्यावेळी हेलन यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले नव्हते. तर पहिले लग्न होऊन फक्त दोन वर्ष झाली होती.

दोनदा अडकले लग्नगाठीत
1964 मध्ये सलीम खान यांनी महाराष्ट्रातील ब्राम्हण मुलगी सुशीला चरकसोबत लग्न केले. लग्नाच्या वेळी सुशीला यांनी त्यांचे नाव बदलून सलमा ठेवले. 27 डिसेंबर 1965 रोजी त्यांचा थोरला मुलगा सलमान खानचा जन्म झाला. सलीम आणि सलमा यांची एकुण चार मुले आहेत. सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान आणि अ‍लविरा ही त्यांची नावे. 1981 मध्ये सलीम खान यांनी प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री हेलेनसोबत दुसरे लग्न केले. हेलन आणि सलीम खान यांचे एकही अपत्य नाही. त्यामुळे त्यांनी एका मुलीला दत्तक घेतले. तिचे नाव आहे अर्पिता खान. अर्पिताचे आता लग्न झाले आहे.

मुंबईत आले होते हीरो बनण्यासाठी
सलीम खान यांची अभिनेता होण्याची इच्छा होती. त्यासाठी ते मुंबईत दाखल झाले. सुरुवातीला त्यांना छोटे-मोठे रोल मिळाले. त्यांनी जवळजवळ 14 सिनेमांमध्ये कॅमिओ रोल साकारले. मात्र अभिनेते म्हणून ते यशस्वी होऊ शकले नाहीत. अभिनेता म्हणून ते 'तीसरी मंजिल' (1966) आणि 'सरहदी लुटेरा', 'दीवाना' (1967) आणि 'वफादार' (1977) या चित्रपटांत झळकले होते.

'तीसरी मंजिल'मधील आयकॉनिक साँग
'तीसरी मंजिल' या चित्रपटात शम्मी कपूर आणि आशा पारेख यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटात हेलन यांच्यावर आयकॉनिक डान्स नंबर चित्रीत झाला होता. हे गाणे होते - 'ओ हसीना जुल्फों वाली जाने जहां'... या गाण्यात सलीम हेलन यांच्यासोबत दिसले होते. विजय आनंद यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आरडी बर्मन यांचे संगीतकार होते आणि मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी या गाण्याला स्वरसाज चढवला होता.

मैत्री जेव्हा जोडीत बदलली
सलीम खान यांचा अभिनय क्षेत्रात संघर्ष सुरु होता. त्यावेळी 'सरहदी लुटेरा' या सिनेमासाठी जावेद अख्तर संवाद लेखन करत होते. जावेद यांना मिळालेली ही पहिली संधी होती. या सिनेमाच्या मुख्य डायलॉग रायटरची प्रकृती बिघडल्याने त्यांना ही संधी मिळाली होती. येथूनच दोघांमध्ये मैत्री झाली. या दोघांनी 70 आणि 80 च्या दशकात एकुण 24 सिनेमांसाठी स्क्रिप्ट लिहिली. त्यापैकी 20 सिनेमे सुपरहिट ठरले. सलीम-जावेद ही जोडी स्क्र‍िप्ट रायटर म्हणून पडद्यावर झळकणारे पहिले नाव होते.

मैत्रीत निर्माण झाले वितुष्ट
1982 मध्ये फिल्म 'शक्ति'च्या काळात दोघांच्या मैत्रीत वितुष्ट निर्माण झाले आणि दोघांचे मार्ग वेगळे झालेत. दोघांनी 1987 मध्ये 'मिस्टर इंडिया' साठी शेवटचे काम केले होते. मैत्री तुटल्यानंतर जावेद अख्तर यांनी लिखाण सुरु ठेवले होते. तर सलीम खान यांनी मात्र 1996 नंतर स्टोरी रायटिंगला अलविदा म्हटले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser