आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न ऐकलेले किस्से:हृतिकच्या आधी शाहरुख खानला ऑफर करण्यात आली होती अकबरची भूमिका, चित्रपटात जोधा बनलेल्या ऐश्वर्याने घातले होते 400 किलोचे सोन्याचे दागिने

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जोधा अकबर चित्रपटाचे न ऐकलेले किस्से...

15 फेब्रुवारी 2008 रोजी प्रदर्शित झालेल्या जोधा-अकबर या चित्रपटाला आज 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटात मुघल सम्राट अकबराची कहाणी मांडण्यात आली होती, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आज या चित्रपटाला 14 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जाणून घेऊया चित्रपटाशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी-

हृतिक रोशनच्या आधी आशुतोष गोवारीकरांनी या चित्रपटातील अकबरच्या भूमिकेसाठी शाहरुख खानशी संपर्क साधला होता. या चित्रपटाच्या दीर्घ शूटिंग शेड्युलमुळे शाहरुखने हा चित्रपट नाकारला होता. नंतर हा चित्रपट हृतिककडे गेला. शाहरुखने आशुतोष यांच्यासोबत स्वदेश या चित्रपटात काम केले आहे.

जोधा-अकबर चित्रपटात शाही साम्राज्य दाखवण्यासाठी 80 हत्ती, 100 घोडे आणि 55 उंट वापरण्यात आले होते.

शूटिंगसाठी वापरलेले सर्व घोडे प्रशिक्षित होते. चित्रपटात असे अनेक सीन्स होते ज्यात घोड्यांनी न हलवता उभे रहायचे होते. परंतु अॅक्शन ऐकून ते हालचाल करु लागायचे. अशा परिस्थितीत दिग्दर्शकाला अॅक्शनऐवजी इतर शब्द वापरावे लागले होते.

चित्रपटात अकबरची पत्नी जोधाबाईच्या भूमिकेत दिसलेल्या ऐश्वर्या रायने बनावट नव्हे तर खरे सोन्याचे दागिने परिधान केले होते. 400 किलोपेक्षा जास्त वजनाचे दागिने अभिनेत्रीने वेगवेगळ्या दृश्यांमध्ये वापरले होते. अभिनेत्रीने परिधान केलेले लेहेंगे देखील डिझायनर्सनी अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर तयार केले होते.

ऐश्वर्याचे सर्व दागिने बनवण्यासाठी अस्सल सोन्याचा वापर करण्यात आला, ज्यासाठी 70 कारागिरांनी अनेक महिने मेहनत घेतली होती.

शूटिंगमध्ये वापरण्यात आलेल्या मौल्यवान वस्तू आणि इतर वस्तूंच्या रक्षणासाठी सेटवर 50 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

हा पहिला चित्रपट होता, ज्यात ऐश्वर्याला लग्नानंतर पहिल्यांदाच ऐश्वर्या राय बच्चन म्हणून क्रेडिट देण्यात आले होते.

'मंगल पांडे' या चित्रपटानंतर ए. आर. रहमान यांनी पीरियड ड्रामा चित्रपटासाठी संगीत न देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकल्यावर त्यांनी आपला निर्णय बदलला.

कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. येथे राजवाड्यासारखा भव्य सेट तयार करण्यात आला होता, जो शूटिंगनंतरही पाडला गेला नाही. मात्र 2021 मध्ये येथे मोठी आग लागली होती.

या चित्रपटात बैरम खांची भूमिका करणारा अभिनेता योगेश सुरी हा प्रत्यक्षात विंग कमांडर होते, त्यांनी मिग 21 आणि मिग 25 सारखी विमाने उडवली आहेत.

या चित्रपटात जोधाबाईच्या आईची भूमिका सायरा बानू यांना ऑफर करण्यात आली होती, परंतु कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.

या चित्रपटात दाखवलेले सर्व जेवण शाही स्वयंपाकघरात तुपात शिजवलेले होते. एका सीनसाठी कलाकारांना या पदार्थाचा आस्वाद घ्यावा लागला, पण डाएटमुळे कलाकारांनी रिटेक देण्यास नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...