आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर-आलिया वेडिंग:रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या पॉवर कपलकडे आहेत अनेक मोठ्या ब्रँड्सच्या ऑफर्स

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रणबीर-आलिया करत आहेत एंडोर्समेंटची निवड

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यांच्या लग्नाची बातमी समोर आली तेव्हापासून या जोडप्याला अनेक एंडोर्समेंट ऑफर मिळू लागल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, रणबीर आणि आलिया सध्या एंडोर्समेंट ऑफरची निवड करत आहेत. अलीकडेच, या दोघांनी एका ई-कॉमर्स ब्रँडच्या जाहिरातीसाठी शूट केले आहे.

रणबीर-आलिया करत आहेत एंडोर्समेंटची निवड
रणबीर आणि आलियाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “रणबीर आणि आलिया हे बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार आहेत. हे लक्षात घेऊन अनेक ब्रँड्स जाहिरातींच्या शूटिंगसाठी या जोडप्याशी संपर्क साधत आहेत. तर आलिया आणि रणबीर दोघेही त्यांना ज्या ब्रँड्ससाठी काम करायचे आहे, त्यापैकी निवडक ब्रँड्सची निवड करत आहेत. त्यांना जाहिराती शूट करण्याची घाई नाही."

रणबीर-आलियाचे एका चित्रपटाचे मानधन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट एका चित्रपटासाठी जवळपास 15 कोटी रुपये मानधन घेत आहे. तिने तिच्या आगामी 'डार्लिंग' चित्रपटासाठी 15 कोटी रुपये घेतले आहेत. आलियाशिवाय या चित्रपटात शेफाली शाह आणि विजय वर्मा यांच्याही भूमिका आहेत. दुसरीकडे, रणबीर कपूरने संदीप रेड्डी यांच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटासाठी 60-70 कोटी रुपये घेतले आहेत.

रणबीर-आलियाची ब्रँड व्हॅल्यू
वार्षिक सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशननुसार, आलिया भट्टची ब्रँड व्हॅल्यू सुमारे 68.1 मिलियन डॉलर आहे. तर दुसरीकडे रणबीरची ब्रँड व्हॅल्यू जवळपास 26.7 मिलियन डॉलर इतकी आहे.

रणबीर-आलियाचे आगामी प्रोजेक्ट्स
आलिया भट्ट तिच्या 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगसाठी अमेरिकेला जाणार आहे, तर रणबीर कपूर संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात अभिनेता रश्मिका मंदान्ना त्याच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय 9 सप्टेंबर 2022 रोजी रणबीर आणि आलियाचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.