आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खंत:सलमान खानपुर्वी चंद्रचूरला मिळाली होती 'कुछ कुछ होता है'ची ऑफर, करण जोहरला नकार दिल्याचा अभिनेत्याला झाला होता पश्चाताप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमान खानपूर्वी ही भूमिका चंद्रचूर सिंगला ऑफर झाली होती.

1998 साली रिलीज झालेला 'कुछ कुछ होता है' हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. करण जोहरने दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट त्यावर्षीचा बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट ठरला होता. शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या, तर सलमान खानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. सलमानने काही मिनिटांच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. पण क्वचितच लोकांना ठाऊक असावे की, सलमान खानपूर्वी ही भूमिका चंद्रचूर सिंगला ऑफर झाली होती, पण त्याने ती नाकारली होती.

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटात सहायक दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर करण जोहरने 1998 मध्ये 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपट करणचा डायरेक्टोरियल डेब्यू होता. अलीकडेच डीएनएशी झालेल्या चर्चेत चंद्रचूरने सांगितले की, करणचा चित्रपट सोडल्याबद्दल त्याला मनापासून पश्चाताप झाला होता. चंद्रचूर म्हणाला, 'हा निर्णय माझ्या करीअरसाठी अत्यंत चुकीचा ठरला. हा चित्रपट बर्‍याच वर्षांपासून एक कल्ट चित्रपट आहे. जे घडायचे तेच घडत असते', अशी खंत त्याने व्यक्त केली.  या निर्णयामुळे चंद्रचूरला एक धडा मिळाला होता.

  • यापूर्वी तीन कलाकारांनी ही ऑफर नाकारली होती

यापूर्वीही करण जोहरने झी टीव्हीच्या एका शोमध्ये चंद्रचूर सिंगने हा चित्रपट नाकारल्याचे सांगितले होते. इतकेच नाही तर ही भूमिका त्याने तीन अभिनेत्यांना ऑफर केली होती, त्या सगळ्यांनी यासाठी नकार दिल्याचे करणने सांगितले होते. करणने सांगितले होते की, चंद्रचूरसोबत फोनवर बोलणे झाल्यानंतर दुस-या दिवशी त्याने करणला स्क्रिप्ट ऐकण्यासाठी घरी बोलावले होते. करण स्क्रिप्ट ऐकवण्यासाठी त्याच्या मलाबारस्थित बंगल्यावर गेला, मात्र चंद्रचूरने स्क्रिप्ट ऐकण्याआधीच नकार दिला होता, असा खुलासा करणने केला होता. इतकेच नाही तर टॉक शोमध्ये करणने नाराजी व्यक्त करताना म्हटले होते की, जर त्याला नकारच द्यायचा होता तर तो फोनवरही देता आला असता, त्यासाठी माझे दोन तास का वाया घालवले. 

चंद्रचूर सिंगने दीर्घ काळानंतर 'आर्या' या वेब सीरिजमधून अभिनयात पुनरागमन केले. त्याच्यासोबत सुष्मिता सेन मुख्य भूमिकेत आहे.

बातम्या आणखी आहेत...