आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सध्या बऱ्याच चित्रपटाचे शूटिंग वेळेवर पूर्ण केले जात आहे. उदाहरण म्हणून कार्तिक आर्यनने 'धमाका’ चित्रपटाचे शूटिंग फक्त 10 दिवसांत पूर्ण केले. याचप्रमाणे सोनम कपूर आहूजानेदेखील 'ब्लाइंड’ चित्रपटाचे शूटिंग फक्त 39 दिवसात पूर्ण केले. आता तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन यांनी इतर चित्रपटात व्यग्र असूनही 'लूप लपेटा’चे शूटिंग फक्त 42 दिवसांत पूर्ण केले. आकाश भाटिया दिग्दर्शित हा चित्रपट एक थ्रिलर कॉमेडी चित्रपट आहे. याची कथा 1998 मध्ये रिलीज झालेला जर्मन क्लासिक कल्ट चित्रपट 'रन लोला रन’वरुन घेण्यात आली आहे.
स्वत:ची सुरक्षा करण्यातच सर्वांचा रोज अर्धा तास जायचा
याविषयी ताहिर सांगतात, आम्ही डिसेंबरमध्ये सुरक्षेचे सर्व नियम पाळत शूटिंग केले होते. सेटवर जाताच ऑक्सिजन लेव्हल चेक करायचो, नंतर पूर्ण शरीराला स्प्रे केले जायचे. व्हॅनिटी व्हॅनलादेखील सॅनिटाइज केले जायचे. विशेष म्हणजे सेटवर विमानतळासारखी सुरक्षा असायची. म्हणजे रोज अर्धा-पाऊणतास यात जायचा. तरदेखील आम्ही याचे शूटिंग 42 दिवसांत पूर्ण केले.
कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरच करायचे दोघे रोमँटिक सीन
या रोमँटिक धाटणीच्या चित्रपटात तापसी आणि ताहिरचे काही रोमँटिक सीनदेखील चित्रीत करण्यात आले आहेत. याविषयी ताहिरने सांगितले, या सीनच्या शूटिंग दरम्यान आम्ही विशेष सुरक्षेची काळजी घ्यायचो. कारण यात दोन कलाकारांना जवळ यायचे असते. तेही मास्क न घालता, प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्हाला जवळून येऊन संवाद बोलायचे होते. शूटिंगच्या वेळी एकाच प्लेटमध्ये जेवावे लगायचे. त्यामुळे आमच्या सर्व कलाकारांचे आरटीपीसीआर टेस्ट व्हायची. त्या टेस्टची रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरचं रोमँटिक सीन चित्रीत केले जायचे.
आकाश भाटियाचे दिग्दर्शन
'लूप लपेटा'मध्ये तापसी आणि ताहिर मुख्य भूमिकेत आहेत. तनुज गर्ग, अतुल कासबेकर आणि आयुष माहेश्वरी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.सोबतच आकाश भाटिया यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.