आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिस कलेक्शन:अक्षय कुमार स्टारर 'बेल बॉटम' ने दुसऱ्या दिवशी केली 2.40 कोटींची कमाई ; वीकेंडला चित्रपटाची कमाई वाढण्याची अपेक्षा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाचे लाइफटाइम कलेक्शन 25-30 कोटी रुपये अपेक्षित आहे

अक्षय कुमारच्या अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'बेल बॉटम'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला (गुरुवारी) ला 2.75 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या आकड्यात वाढऐवजी घट बघायला मिळाली आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 2.40 कोटींच्या जवळपास गेले आहे. अशाप्रकारे या चित्रपटाने दोन दिवसांत 5 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. व्यापार विश्लेषकांच्या मते, चित्रपटाची कमाई आठवड्याच्या शेवटी वाढण्याची अपेक्षा आहे.

पहिल्या वीकेंडला चित्रपटाचे एकूण कलेक्शन 13 कोटी रुपये असू शकते
व्यापार विश्लेषकांच्या मते, शनिवारी आणि रविवारी चित्रपटाच्या कमाईत वाढू दिसू शकते. पहिल्या वीकेंडमध्ये 4 दिवसांची एकूण कमाई 13 कोटी रुपयांच्या जवळपास असू शकते. रिलीज होण्याआधीच या चित्रपटाचे 24 लाख रुपयांचे अॅडव्हान्स बुकिंग झाले होते आणि चित्रपटाला समीक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशा स्थितीत चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

रणजित एम तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाने सिनेमा आणि बॉलिवूडला नक्कीच एक आशेचा किरण दाखवला आहे. चित्रपटाच्या कमाईच्या दृष्टीने ही आनंदाची बाब आहे की, आता मध्य प्रदेशातही चित्रपटगृहे सुरू झाली आहेत. कोरोना संसर्गाचा धोका अजूनही कायम आहे. अशा परिस्थितीत, 50 टक्के आसन क्षमतेसह चित्रपटगृहे नुकतीच उघडली गेली आहेत.

चित्रपटाचे लाइफटाइम कलेक्शन 25-30 कोटी रुपये अपेक्षित आहे
'बेल बॉटम' आतापर्यंत देशभरात 800 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. अशा परिस्थितीत 'बेल बॉटम'चे एकुण कलेक्शन 25-30 कोटी रुपये असेल अशी अपेक्षा आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त, वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरैशी देखील 'बेल बॉटम' मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा विमान अपहरण आणि त्याच्या रेस्क्यूवर आधारित आहे.

बातम्या आणखी आहेत...