आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • BellBottom Box Office Collection Day 1: Akshay Kumar Vaani Kapoor Starrer Bellbottom Made An Opening Collection Of Rs 2.75 Crore, The Film Did Not Live Up To The Expectations Of Trade Experts

बेलबॉटम -Box Office Collection:अक्षय कुमार -वाणी कपूर स्टारर बेलबॉटमने केले 2.75 कोटी रुपयांचे ओपनिंग कलेक्शन, ट्रेड एक्सपर्टच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही चित्रपट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रातील थिएटर बंद असल्याने झाले प्रचंड नुकसान

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरैशी स्टारर बेलबॉटम हा चित्रपट 19 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ब-याच काळानंतर चित्रपटगृहांमध्ये दाखल झालेल्या या चित्रपटाकडून समीक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र हा चित्रपट अपेक्षांवर खरा उतरला नाही. चित्रपटाने पहिल्या दिवशी 2.75 कोटी रुपयांचे ओपनिंग कलेक्शन केले आहे, तर व्यापार तज्ज्ञांनी 3 ते 4 कोटींच्या कलेक्शनची अपेक्षा व्यक्त केली होती.

महाराष्ट्रातील थिएटर बंद असल्याने झाले प्रचंड नुकसान

कोविड 19 च्या सध्याच्या परिस्थितीमुळे, महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहे अद्याप बंद आहेत. त्यामुळे येथील प्रेक्षकांना ओटीटीवर चित्रपट येण्याची प्रतीक्षा करावी लागेल. हा चित्रपट दिल्ली, कानपूर, मेरठ, बरेली, चंदीगड आणि देहरादून सारख्या अनेक मोठ्या शहरांमध्ये प्रदर्शित झाला आहे परंतु या शहरांमध्ये प्रमोशन नसल्यामुळे प्रेक्षक चित्रपटगृहांपर्यंत पोहोचू शकले नाहीत.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, नवी दिल्ली चित्रपटांसाठी मोठी बाजारपेठ मानली जाते. येथे देशभरातील एकुण 20 टक्के प्रेक्षक आहेत. हा चित्रपट 1000 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

सर्व महत्त्वाच्या शहरांमधील चित्रपटगृह देखील केवळ 50 टक्के क्षमतेसह खुले आहेत. यामुळे चित्रपटाचे खूप नुकसान होत आहे. चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन अक्षयचा फ्लॉप चित्रपट जोकरपेक्षा देखील कमी आहे. जोकरने पहिल्या दिवशी 5 कोटींची कमाई केली होती.

'बेलबॉटम'चे कलेक्शन राजकुमार राव-जान्हवी कपूर स्टारर 'रुही अफजा' या चित्रपटाच्या तुलनेत कमी आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 कोटींची कमाई केली होती. या व्यतिरिक्त जॉन अब्राहम स्टारर 'मुंबई सागा', जो कोविडच्या पहिल्या लाटेनंतर रिलीज झाला होता, त्याने 2.84 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. बऱ्याच काळानंतर पहिल्यांदाच ए लिस्टर चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे, त्यामुळे प्रत्येकाला बेलबॉटमकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र हा चित्रपट ट्रेड च्या अपेक्षा पूर्ण करेल असे वाटत नाही.

बातम्या आणखी आहेत...