आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शूटिंगची तयारी:चार्टर्ड प्लेनने इंग्लंडला जाऊ शकते ‘बेल बॉटम’ची टीम, आंतरराष्ट्रीय विमानसेवा न मिळाल्याने घेतला निर्णय

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये होणार चित्रीकरण

अक्षय कुमार आणि वाणी कपूर लवकरच स्कॉटलंड आणि इंग्लंडच्या विविध भागांत ‘बेल बॉटम’ या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करतील. चित्रीकरणासाठी निर्माते सध्या रणनीती तयार करत आहेत. याबाबत चित्रपटाचे लेखक असीम अरोरा यांनी सांगितले की, आम्ही सर्व जण लस उपलब्ध नसली तरी चित्रीकरण सुरू करत आहोत. नियोजन ऑगस्टचेच आहे. सध्या आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू नाहीत, त्यामुळे चार्टर्ड फ्लाइट बुक केल्या जातील. सध्या नियोजन सुरू आहे. लवकरच ठोस माहिती मिळेल.

  • अक्षय कुमारने हिंमत दाखवली, सर्व झाले तयार

असीम सांगतात की, आतापर्यंत अक्षय कुमारने हिंमत दाखवली आणि सर्व जण शूटिंगसाठी तयार झाले. अक्षय म्हणाला की, आमच्यासमोर धोकादायक वातावरण आहे. सेटवर एकही व्यक्ती आजारी पडू नये अशी तयारी ठेवावी लागेल. हे सर्व लक्षात ठेवून चित्रपट लॉकडाऊनच्या आधी जसा तयार होणार होता तसाच होईल.

तांत्रिकदृष्ट्या सुरू झाली ही तयारी

  • सेटवर सर्वांजवळ पीपीई किट्स, मास्क, ग्लोव्हज आणि शील्ड असतील.
  • सेटवर आत जाण्याच्या आधी चाचणी होईल.
  • दररोज थर्मल आणि ऑक्सिमीटर तपासणी होईल.
  • एका वेगळ्या स्तराची तयारी सुरू आहे, त्याची ब्लूप्रिंट तयार झाली आहे.
  • चित्रीकरण 40 ते 50 दिवसांत संपवण्याची योजना आहे.