आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुसरत जहाँच्या घरी चिमुकल्याचे आगमन:बंगाली अभिनेत्री आणि TMC खासदार नुसरत जहाँ यांनी दिला मुलाला जन्म, विभक्त झालेला पती  निखिल म्हणाला होता - 'हे मूल माझे नाही'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.

बंगाली अभिनेत्री आणि टीएमसीच्या खासदार नुसरत जहाँ आई झाल्या आहेत. प्रसूतीसाठी त्यांना 25 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त होते. आता मीडिया रिपोर्टनुसार, नुसरत यांनी 26 ऑगस्ट रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. प्रसूतीदरम्यान नुसरतची काळजी घेण्यासाठी बंगाली अभिनेता यश दासगुप्ता त्यांच्यासोबत उपस्थित होता.

दरम्यान, नुसरत यांनी 26 ऑगस्ट रोजी सकाळी सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये त्या विदाउट मेकअप दिसत आहेत. नुसरतने यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'भीतीपेक्षा विश्वास जास्त आहे.' या कॅप्शनसह, नुसरत यांनी पॉझिटिव्हिटी आणि मॉर्निंग व्हाईब्स सारखे हॅशटॅग वापरले.

पतीबरोबर झाला वाद
काही दिवसांपूर्वी नुसरत या पती निखिल जैन यांच्याशी झालेल्या वादामुळे प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. निखिल आणि नुसरत गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून वेगळे राहत आहेत. दोघांच्या नातेसंबंधावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते, त्यानंतर नुसरत यांनी माध्यमांसमोर येऊन निखिलसोबतचे त्यांचे लग्न बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. आणि सोबतच निखिल जैनवर त्यांनी पैशांचा गैरव्यवहार आणि फसवणुकीचा आरोप केला होता.

दोन वर्षांपूर्वी झाले होते लग्न
2019 मध्ये नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांनी टर्कीमध्ये लग्न केले होते. या दोघांचा लग्नसोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला होता. त्यानंतर सोशल मीडियावरही या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण नंतर त्यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाले.

नुसरत यांनी एक निवेदन जारी करत स्पष्ट केले होते की, त्यांचे लग्न टर्की मॅरेज रजिस्ट्रेशन कायद्यानुसार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. दोन वेगवेगळ्या धर्मातील लोकांचे हे लग्न होते. त्यामुळे त्याची स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार नोंदणी होणे गरजेचे होते, पण ते कधीच झाले नाही. त्यामुळे घटस्फोट घेण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

अभिनेता यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा

नुसरत जहाँ आता अभिनेता यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. यावर यशने मात्र आम्ही दोघे फक्त प्रोफेशनल पार्टनर असल्याचे म्हटले होते. नुसरत आणि यश यांनी बंगाली चित्रपट एसओएस कोलकातामध्ये एकत्र काम केले होते. हा चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित झाला होता.

बातम्या आणखी आहेत...