आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शुटिंग अपडेट्स:'भाभीजी घर पर हैं'च्या निर्मात्या बिनाफर कोहली गाइडलाइनमुळे नाराज;  8 तासांची शिफ्ट, स्टाफ कटवर उपस्थित केले प्रश्न

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निर्मात्यांना आठ तासांपेक्षा जास्त शूटिंग करण्याची परवानगी नाही.

अलीकडेच महाराष्ट्र सरकारने चित्रपट आणि टीव्ही मालिकांंच्या चित्रीकरणासाठी परवानगी दिली आहे. चित्रपट निर्माते आणि टीव्ही निर्मात्यांना 16 पानांची गाइडलाइन दिलेली आहे. त्यानुसारच काही शोजच्या चित्रीकरणाला 23 जूनपासून सुरुवात झाली आहे.  पण भाभीजी घर पर है या मालिकेच्या निर्मात्या बिनाफर कोहली मार्गदर्शक तत्त्वांच्या काही नियमांमुळे नाराज आहेत. ज्यामुळे शूट अद्याप सुरू झालेले नाही.

  • काय आहे गाइडलाइन?
  • महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निर्मात्यांना आठ तासांपेक्षा जास्त शूटिंग करण्याची परवानगी नाही.
  • सेटवरील प्रत्येक कर्मचार्‍याचे थर्मल चेकअप करणे अनिवार्य आहे.
  • सेटवर फक्त 33 टक्के क्रू हजर असण्याची परवानगी आहे.
  • यासह कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक सदस्याचा 50 लाखांचा विमा काढणे ही निर्मात्याचीही जबाबदारी आहे.

8-तासांच्या शिफ्टमध्ये काम करणे कठीण: बेनिफर 

पिंकविलाच्या नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, भाभीजी घर पर है या विनोदी मालिकेच्या निर्मात्या बिनाफर म्हणाल्या, "असोसिएशनची चिंता आणि विचार योग्य आहे कारण तो जीवनाचा प्रश्न आहे. परंतु 8 तासांच्या शिफ्टमध्ये काम करणे शक्य होणार नाहीये. सर्व प्रथम, आम्हाला 40 ते 50 लोकांचे थर्मल चेकअप करावे लागेल, त्याचा दररोज अहवाल तयार करावा लागेल. याशिवाय सेटवर जेव्हा अभिनेता हजर असेल तेव्हा सेटवर इतर कोणताही कर्मचारी येऊ शकणार नाही. लाइटमॅन लाइट तपासल्यानंतर बाहेर जातील. अभिनेता बाहेर गेल्यानंतर पुन्हा अँगल बदलला जाईल. हे सर्व 8 तासांत शक्य नाही, असे त्या म्हणाल्या आहेत. 

दीड दिवसांत एक एपिसोड तयार होतो जो आता अडीच दिवसांत तयार होईल. मग लंच ब्रेक देखील आहे, त्यामुळे आऊटपुट कसे प्राप्त केले जाईल? आम्हाला ऑनएअर जाण्यासाठी अनेक एपिसोड्सच्या बँकची गरज असते.

  • कमी मानधनात काम करण्यास तयार नाहीत कलाकार 

मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, निर्माते कलाकारांच्या मानधनात कपात करु शकत नाहीत.  परंतु चॅनेल जाहिराती न मिळाल्यास निर्मात्यांना हे पाऊल उचलावे लागू शकते. ही काळाजी गरज आहे. याबाबत बिनाफार म्हणाल्या, 'जास्त मानधन घेणारा कलाकार कमी पैशांत काम करण्यास तयार नाहीये. आणि आम्ही त्याला रिप्लेसही करु शकत नाही. त्यामुळे अनेक निर्मात्यांना  या प्रकारची समस्या भेडसावत आहे.'

  • पावसामुळे अडचणी वाढतील

सेटवरील कोणत्याही व्यक्तीची प्रकृती बिघडल्यास, सर्व कर्मचार्‍यांना त्याचा रिपोर्ट येईपर्यंत क्वारंटाइन केले जाईल. याविषयी बिनाफर म्हणतात, 'एखाद्या व्यक्तीला पावसाळ्यामुळे ताप आला असला तरी आम्हाला त्या व्यक्तीचा रिपोर्ट येईपर्यंत चार दिवस शूटिंग थांबवावे लागेल. पण मला असोसिएशनवर पूर्ण विश्वास आहे. त्यांचा स्टाफ  तीन महिन्यांपासून  कामाविना आहे. त्यांना स्टाफसाठी लवकरात लवकर काम सुरु करावे लागेल.' 

0