आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bhagwan Dada Was So Much Rich That He Used To Go To The Set Every Day In A New Car, But Due To The Constraints, He Spent The Last Time In The Chawl.

भगवान दादांची पुण्यतिथी:श्रीमंत एवढे की दररोज नवीन गाडीतून सेटवर जायचे, पण आर्थिक अडचणीमुळे शेवटचा काळ चाळीत घालवला

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज दादांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याशी निगडीत काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात -

भगवान दादा… जे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले डान्सिंग सुपरस्टार होते, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कापड गिरणीत मजूर म्हणून केली. त्यांना हिंदी चित्रपटातील पहिला अ‍ॅक्शन हिरो ही पदवीही देण्यात आली होती. दादा इतके श्रीमंत होते की त्यांच्याकडे 7 गाड्या होत्या आणि ते रोज नवीन कार घेऊन चित्रपटांच्या सेटवर जात असत. त्यांच्या नृत्याची जादू अशी होती की अमिताभ बच्चन, गोविंदा आणि मिथुन त्यांना त्यांचे प्रेरणास्थान मानतात आणि आजही त्यांच्या नृत्याच्या स्टेप्स फॉलो करतात.

आज दादांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याशी निगडीत काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात -

कारकिर्दीच्या सुरुवातीला कापड गिरणीत काम करायचे भगवान दादा

भगवान दादांचा जन्म 1913 मध्ये अमरावती, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे खरे नाव भगवान आबाजी पांडव होते. त्यांचे बालपण दादर आणि परळच्या मजूर भागात गेले आणि चौथीनंतर त्यांनी शिक्षण सोडले. यानंतर दादा कापड गिरणीत मजूर म्हणून काम करू लागले. काम करत असतानाच भगवान दादांचा अभिनयाकडे कल होता.

अभिनेता, दिग्दर्शक आणि कॉमेडीचे बादशाह

भगवान दादांनी मूकपटांच्या काळात भारतीय चित्रपटात काम करायला सुरुवात केली. यादरम्यान ते चित्रपट निर्मितीही शिकले. 1931 ते 1996 पर्यंत म्हणजेच सुमारे 65 वर्षे त्यांनी सिनेविश्वात अभिनेता, दिग्दर्शक आणि कॉमेडीचे बादशाह म्हणून काम केले. भगवान दादांनी 'क्रिमिनल' या चित्रपटातून फिल्मी दुनियेत पदार्पण केले.

दादांनी पहिला दिग्दर्शित केलेला चित्रपट 'बहादूर किसान' हा होता. त्यांनी 1938 मध्ये चंद्रराव यांच्यासोबत या चित्रपटाचे सहदिग्दर्शन केले. त्यानंतर त्यांनी 'वना मोहिनी' हा तामिळ चित्रपट दिग्दर्शित केला जो भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील महत्त्वाचा चित्रपट आहे. हा चित्रपट 'डोरोथी लॅमॉर' या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक होता.

'अलबेला' राज कपूर यांच्या सांगण्यावरून बनवला होता
राज कपूर आणि भगवान दादा चांगले मित्र होते. राज कपूर यांनी त्यांना सामाजिक संदेश देणारा चित्रपट बनवण्याचा सल्ला दिला, त्यानंतर त्यांनी 'अलबेला' हा चित्रपट केला, जो त्या वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. या चित्रपटातील 'शोला जो भडके' आणि 'भोली सुरत दिल के खोटे' ही गाणी आजही लोकांच्या लक्षात आहे. भगवान दादांचा पहिला बोलपट चित्रपट 'हिम्मत-ए-मर्दा' होता. या चित्रपटात ललिता पवार मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या.

दादांकडे 7 गाड्या होत्या, रोज नवीन गाडीने ते सेटवर जायचे
भगवान दादा शेवरले कारचे शौकीन होते. यामुळेच त्यांनी 'शेवरले' नावाच्या चित्रपटातही काम केले होते. दादांकडे 7 गाड्या होत्या आणि ते रोज नवीन गाडीने सेटवर जात असत. एक किस्सा असाही आहे की, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या एका चित्रपटातील एका दृश्यात त्यांना पैशांचा पाऊस दाखवायचा होता आणि त्यासाठी त्यांनी खऱ्या नोटांचा वापर केला होता.

अमिताभ, गोविंदा आणि मिथुन यांनी डान्स स्टाइल फॉलो केली
सोलो हीरो म्हणून अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट 'बॉम्बे टू गोवा' होता. त्यावेळी अमिताभ यांना डान्स येत नव्हता. 'देखा न हाय रे सोचा न हाय रे रख दी निशाने पे जां...' या गाण्यावर अमिताभ यांना डान्स करायचा होता, पण त्यांना ते जमले नाही. अशा परिस्थितीत अमिताभ यांनी नृत्यशैली विकसित केली, जी भगवान दादांच्या शैलीसारखीच होती. अमिताभ व्यतिरिक्त गोविंदा आणि मिथुन यांनीही भगवान दादांकडून प्रेरणा घेतली. ऋषी कपूर यांना भगवान दादांनीच नृत्याच्या स्टेप्स शिकवल्या होत्या.

दादांच्या जोरदार थापडेने बिघडला होता ललिता पवार यांचा चेहरा
एक किस्सा म्हणजे, 1942 मध्ये 'जंग-ए-आझादी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भगवान दादांना ललिता पवार यांना थोबाडीत मारायची होती. पण त्यांनी ललिता पवार यांना एवढे जोरात मारले की ललिता पवार जखमी झाल्या आणि त्यांच्या डाव्या डोळ्यातील रक्तवाहिनी आतून फुटली आणि त्यांच्या तोंडाच्या डाव्या बाजूला अर्धांगवायू झाला. तीन वर्षे त्यांच्यावर उपचार करण्यात आले, पण त्यांचा डोळा बरा होऊ शकला नाही. तेव्हापासून ललिता यांनी नायिकेच्या नव्हे तर नकारात्मक भूमिका करायला सुरुवात केली. मात्र, भगवान दादांना या अपघाताबद्दल आयुष्यभर पश्चाताप झाला.

किशोर कुमार यांच्या नख-यामुळे झाले होते मोठे नुकसान

भगवान दादांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले, पण मराठी भाषिक असूनही त्यांनी एकही मराठी चित्रपट केला नाही. प्रेक्षकांना हसायला लावणा-या भगवान दादांना मात्र रडवले ते 'हसते रहना' या चित्रपटाने. हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी आपले सर्व काही पणाला लावले होते. या चित्रपटाचे नायक होते किशोर कुमार. पण किशोर कुमार यांच्या नख-यांमुळे त्यांना हा चित्रपट अर्ध्यावरच बंद करावा लागला आणि चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. यामुळे दादांचे इतके नुकसान झाले की त्यांना त्यांचा जुहू येथील बंगला आणि गाड्या विकून टाकाव्या लागल्या.

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी निधनावर व्यक्त केला होता शोक
आर्थिक तंगीमुळे दादांना मुंबईतील चाळीत राहावे लागले होते. भगवान दादा यांचे 4 फेब्रुवारी 2002 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत भगवान दादांनी अभिनय आणि नृत्याच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीला नवा आयाम दिल्याचे म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...