आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोशूटचा किस्सा:फोटोग्राफरने सलमानला भाग्यश्रीला किस करायला सांगितले होते, मात्र सलमानचे उत्तर ऐकून तिचा जीव भांड्यात पडला होता 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री भाग्यश्रीने 90च्या दशकातील एका फोटोशूटचा किस्सा सांगितला आहे.

1989 मध्ये रिलीज झालेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून अभिनेत्री भाग्यश्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि आपल्या निरागस अंदाजाने सगळ्यांचे मन मोहून घेतले. या चित्रपटात ती अभिनेता सलमान खानसोबत झळकली होती. त्यावेळी सलमान-भाग्यश्रीच्या केमिस्ट्रीचीही सर्वत्र जोरदार चर्चा झाली होती. 90 च्या दशकात दोघांनाही अनेक फोटोशूट्स करावे लागले होते. अलीकडेच एका मुलाखतीत भाग्यश्रीने एका फोटोशूटचा किस्सा शेअर केला आहे.

सलमानला सांगितले होते किस करायला

डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्रीने सांगितले, “तेव्हा एक प्रसिद्ध फोटोग्राफर होता, जो आता या जगात नाही. त्याला माझे आणि सलमानचे काही हॉट फोटो हवे होते. त्यासाठी त्याने सलमानला बाजूला नेलं आणि त्याला सांगितलं की, मी जेव्हा कॅमेरा सेटअप करेन तेव्हा तू अचानक भाग्यश्रीच्या ओठांवर किस कर. हे सगळं मी स्वत: ऐकलं होतं.” 

सलमानचं उत्तर ऐकून जीवात जीव आला 

भाग्यश्रीने सांगितले की, सलमानने त्या फोटोग्राफरला असं करण्यापासून साफ नकार दिला होता.  ती म्हणाली, “आम्ही सगळे इंडस्ट्रीत नवीन होतो आणि त्या फोटोग्राफरला वाटत होतं की त्याला असं करायचं स्वातंत्र्य आहे. त्याला किंवा सलमानला माहित नसेल की मी त्यांच्यातील संभाषण ऐकलं होतं. कारण मी त्या दोघांच्या बऱ्यापैकी जवळ उभी होती. एका सेकंदासाठी मी स्तब्धच झाले होते. पण त्यावेळी सलमानला बोलताना ऐकलं की, मी असं काही करणार नाही. तुम्हाला जर अशी कोणती पोझ हवी असेल तर आधी भाग्यश्रीची परवानगी घ्या.” 

''सलमानची ही प्रतिक्रिया ऐकून मी सुटकेचा नि:श्वास सोडला. मी योग्य लोकांसोबत काम करतेय, याची जाणीव मला त्यावेळी झाली होती'', असं भाग्यश्रीने यावेळी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...