आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाउंसमेंट:एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत 'भारत माझा देश आहे' आणि ‘मेरे देश की धरती’, ही आहे प्रदर्शनाची तारीख

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊया या दोन्ही चित्रपटांबद्दल -

'भारत माझा देश आहे' हा मराठी चित्रपट आणि ‘मेरे देश की धरती' या हिंदी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी म्हणजे 6 मे रोजी प्रदर्शित होत आहेत. जाणून घेऊया या दोन्ही चित्रपटांबद्दल -

  • दोन इंजिनिअर तरुणांची कथा आहे ‘मेरे देश की धरती’

आत्मविश्वास आणि चैतन्याचं बेमालूम मिश्रण म्हणजे तरुणाई. आजची तरुणाई काहीतरी नवं करण्यात गुंतलेली असते. देशाच्या प्रगतीसाठी धडपडणाऱ्या दोन इंजिनिअर तरुणांची कथा सांगणाऱ्या कार्निवल मोशन पिक्चर्स’चा ‘मेरे देश की धरती’.... देश बदल रहा है’ हा हिंदी चित्रपट 6 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. देशासाठी विचार करून एकजुटीने केलेली कोणतीही गोष्ट नेहमीच लक्षवेधी आणि यशस्वी ठरते, मग ते देशाचे राजकारण असो वा कल्पकतेचा अविष्कार एकदा का मनात आणलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. नव्या कल्पनांचा शोध घेऊन दोन इंजिनिअर्स तरुण गावचा कसा कायापलट करतात हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे.

शेती हा नेहमीच आपल्या देशाचा कणा राहिला आहे. दोन इंजिनिअर्स तरुण स्वत:ची नोकरी करत असताना, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची उर्मी जपण्यासाठी कसे शेतकरी बनतात, ह्याची हलकी फुलकी रंजक कथा ‘मेरे देश की धरती... देश बदल रहा है’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केलं आहे. 'मिर्झापूर' फेम दिव्यांदू शर्मा, अनुप्रिया गोएंका आणि अनंत विधात या आघाडीच्या कलाकारांसोबत ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.

‘मेरे देश की धरती’ या चित्रपटाच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील वास्तव परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. ‘मेरे देश की धरती’ ही कलाकृती प्रबोधनासोबत देशातील तरुणाईला क्रांतिकारी विचारांकडे नेणारी आहे असा विश्वास कार्निवल मोशन पिक्चर्सच्या संस्थापक आणि संचालिका वैशाली सरवणकर व्यक्त करतात.

  • देशभक्तीपर चित्रपट आहे 'भारत माझा देश आहे'

पांडुरंग कृष्णा जाधव दिग्दर्शित 'भारत माझा देश आहे' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर झाली असून हा चित्रपट येत्या 6 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत या बालकलाकारांसह मंगेश देसाई, शशांक शेंडे, छाया कदम आणि हेमांगी कवी यांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव म्हणतात, "हा एक देशभक्तीपर चित्रपट आहे, मात्र या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे. आतापर्यंत क्वचितच असा विषय या पद्धतीच्या चित्रपटांमध्ये हाताळला गेला असेल. या चित्रपटात अनेक प्रसंग हसवत हसवत, नकळत खूप गोष्टी सांगून जातात, मनाला स्पर्शून जातात. हा एक कौटुंबिक चित्रपट असून प्रत्येक लहान मुलाने आवर्जून पाहावा, असा हा 'भारत माझा देश आहे. या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय अतिशय दमदार असून प्रत्येकाने आपली व्यक्तरेखा उत्तम साकारली आहे. हा चित्रपट एक सकारात्मक दिशा देणारा आहे.''

'भारत माझा देश आहे' या चित्रपटाची कथा पांडुरंग कृष्णा जाधव यांची असून निशांत नाथाराम धापसे यांची पटकथा, संवाद लाभले आहेत. .या चित्रपटाला समीर सामंत गीत लाभले असून अश्विन श्रीनिवासन यांचे संगीत आहे. निलेश गावंड यांनी या चित्रपटाचे संकलक आहेत तर चित्रपटाचे छायांकन नागराज यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...