आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत सिंह प्रकरणात नवीन आरोप:सुब्रमण्यम स्वामी यांचे ट्विट - सुशांतला विष देऊन ठार मारण्यात आले, तपासात ते सापडू नये यासाठी ऑटोप्सीला उशीर केला

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी (डावीकडे) हे सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही होते.  - Divya Marathi
राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी (डावीकडे) हे सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही होते. 
  • अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता.
  • या प्रकरणात सुशांतच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आहे. सीबीआयने आतापर्यंत सुशांतच्या घरी काम करणा-या प्रत्येकाची चौकशी केली आहे. सोबतच त्याचा माजी अकाऊंटंट रजत मेवातीचा जबाबही नोंदवला आहे. दरम्यान, मारेकरी आणि त्यांची सैतानी मानसिकता हळूहळू चव्हाट्यावर येत आहे, असे सांगत भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांतची विष देऊन हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. सुशांत सिंहच्या पोटातच विष विरघळावे, यासाठी ऑटोप्सीला जाणीवपूर्वक उशीर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच जबाबदार असणा-यांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले आहेत.

सुब्रमण्यम स्वामी यांचे ट्विटः

  • सुशांतच्या मृत्यूशी जोडले होते दुबई कनेक्शन

यापूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांतच्या मृत्यूचे दुबई कनेक्शन असल्याचे म्हटले होते. सोमवारी स्वामींनी ट्विट केले की, ''सुनंदा पुष्कर प्रकरणात शवविच्छेदन करत असताना एम्सच्या डॉक्टरांना त्यांच्या पोटात खरे विष आढलले होते. परंतु, श्रीदेवी आणि सुशांत यांच्या प्रकरणात असे काहीच झाले नाही.'' त्यांनी पुढे लिहिले, ''सुशांत प्रकरणात दुबईतील ड्रग्स डिलर अयाश खान सुशांतच्या मृत्यूच्याच दिवशी त्याला भेटला होता. पण का?”, असा प्रश्नदेखील सुब्रमण्यम स्वामी यांनी उपस्थित केला.

  • स्वामींनी केली होती सीबीआय चौकशीची मागणी

सुशांत सिंहच्या कुटुंबासह स्वामी यांनीही या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय आता या प्रकरणी तपास करत आहे. आतापर्यंत सीबीआयने सुशांतचे निकटवर्तीय आणि घरातील कर्मचा-यांची चौकशी केली आहे. मात्र अद्याप सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची चौकशी करण्यात आलेली नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser