आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अटकेतील कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांची मुंबईच्या फोर्ट न्यायालयाने ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. भारतीला कल्याण तुरुंगात, तर हर्षला तळोजा तुरुंगात ठेवण्यात येईल. हा आदेश येताच दांपत्याने दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला, त्यावर सोमवारी सुनावणी होईल.
हर्षची रविवारी सकाळपर्यंत चौकशी झाली. नंतर दुपारी एनसीबीने दोघांना गांजा प्रकरणात नार्कोटिक्स एनडीपीसी कोर्टात हजर केले. तेथे एनसीबीने भारतीला न्यायालयीन कोठडी, तर हर्षला चौकशीसाठी कोठडीची मागणी केली होती. त्यावर भारतीच्या वकिलाने युक्तिवाद केला की, कोठडीचा प्रश्नच उद्भवत नाही. जप्त करण्यात आलेला कथित गांजा एनडीपीएसअधिनियमांतर्गत निर्धारित ‘कमी प्रमाणा’पेक्षाही कमी आहे. न्यायालयाने वकिलाच्या या युक्तिवादावर सहमती दर्शवली.
अशी आहे शिक्षेची तरतूद
१००० ग्रॅमपर्यंत गांजा आढळल्यास तो कमी प्रमाणात असल्याचे मानले जाते आणि त्यासाठी सहा महिन्यांची कैद किंवा १० हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. व्यावसायिक प्रमाण (२० किलो किंवा त्यापेक्षा जास्त) असल्यास २० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यादरम्यानचे प्रमाण असल्यास १० वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.