आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉमेडियन भारती सिंहला अटक:NCBला भारतीच्या घरी आणि ऑफिसमध्ये सापडला 86.5 ग्राम गांजा, पती हर्षसोबत गांजा घेतल्याची दिली कबुली

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीच्या अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा येथील तिन्ही घरांवर रेड टाकण्यात आली

प्रसिद्ध विनोद कलाकार भारती सिंहला नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB)आज अटक केली. चौकशी दरम्यान भारती आणि तिचा नवरा हर्ष यांनी गांजा घेण्याची कबुली दिली आहे. भारतीच्या पतीची अद्याप चौकशी सुरूच आहे. भारतीचे घर आणि प्रॉडक्शन हाऊसवर NCB ने शनिवारी सकाळी छापेमारी केली. दोन्ही ठिकाणाहून NCB च्या अधिकाऱ्यांनी 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

एका अमली पदार्थ तस्कराच्या चौकशीत या दोघांची नावे समोर आली होती. त्यानंतर भारतीच्या अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा येथील तिन्ही घरांवर रेड टाकण्यात आली. विशेष म्हणजे, या धाडीत NCB च्या टीमने अमली पदार्थ जप्त देखील केला आहे.

भारती आणि हर्षला ताब्यात घेऊन चौकशी

NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले, की टीमने भारती आणि हर्ष दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. या दोघांच्या घरी कंझम्पशन क्वांटिटी अर्थात वापरण्यासाठी आणलेल्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, एका ड्रग पेडलरने या दोघांच्या घरी गांजा असल्याची माहिती दिली होती. त्यावरूनच भारतीच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात दोघांनाही एनसीबीच्या प्रांतीय कार्यालयात उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.

बॉलिवूड आणि ड्रग्स

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच बॉलिवूडमध्ये ड्रग्सच्या तपासाला वेग आला. यामध्ये आतापर्यंत अनेक सिलेब्रिटींना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यामध्ये दीपिका पादुकोण आणि तिच्या मॅनेजरसह नावाजलेल्या कलाकारांचा समावेश होता. नुकतेच ड्रग्स प्रकरणात 20 नोव्हेंबर रोजी अर्जुन रामपाल चौकशीसाठी NCB कार्यालयात पोहोचला होता. या ठिकाणी त्याची ड्रग्स प्रकरणात चौकशी करण्यात आली. अर्जुनसह त्याच्या सोबत लिव्ह इनमध्ये राहणारी गॅब्रिएला डेमेट्रिएड्स हिची दोन दिवस चौकशी झाली. या चौकशीनंतर कोर्टाने अर्जुन रामपालचा मित्र पॉल बार्टेलला 25 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कौठडीत पाठवले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser