आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थडे:एक वर्षाचा झाला भारती-हर्षचा मुलगा गोला, चिमुकल्याचे गोंडस फोटो शेअर करत भारती म्हणाली - अगदी आमच्यासारखाच हो

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचा मुलगा गोला अर्थातच लक्ष्य 3 एप्रिल रोजी एक वर्षाचा झाला. चिमुकल्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कपलने त्याचे अतिशय क्यूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटांमध्ये गोला शेफच्या लूकमध्ये दिसतोय. तर काही फोटोंमध्ये त्याने बास्केटमध्ये बसून पोज दिल्या आहेत. गोलाचे फोटो शेअर करत भारतीने लिहिले- 'पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा लक्ष्य लिंबाचिया (गोला) खूप खूप प्रेम बाबू, मोठे होऊन आमच्यासारखाच हो.. देवाचा तुझ्यावर कायम आशीर्वाद असो.'

गोला अर्थातच लक्ष्यची छायाचित्रे -

सेलिब्रिटींनी दिल्या गोलाला शुभेच्छा
गोलाच्या गोंडस फोटोंवर चाहते आणि सेलिब्रिटींनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. टीव्ही अभिनेता सिद्धार्थ निगमने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले- 'वाढदिवसाच्या शुभेच्छा.' गायिका नेहा कक्करने पोस्टवर हार्टचा इमोजी टाकला. अभिनेत्री काजल अग्रवालने लिहिले- 'गोला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुला खूप प्रेम आणि आशीर्वाद.' याशिवाय ईशा गुप्ता, हर्षदीप कौर, आकृती शर्मा, गौहर खान, अर्जुन बिजलानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी गोलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

'बिग बॉस 16'मध्ये झळकला होता चिमुकला गोला
अलीकडेच लक्ष्य म्हणजेच गोला 'बिग बॉस 16'मध्ये पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. हा त्याचा पहिला टीव्ही डेब्यू होता. होस्ट सलमान खानसोबत झालेल्या संवादादरम्यान भारती गमतीने म्हणाली होती- 'सलमान भाई, आता याला तुम्ही सांभाळा, मी दोन दिवसांनी येते.' हर्षदेखील गोलाला म्हणाला होता की, 'काकाला त्रास देऊ नकोस.' यावेळी सलमान आणि गोलाने 'बेबी को बेस पसंद है' या गाण्यावर डान्स केला होता.