आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुनरबाज-देश की शान:प्रसूतीच्या दोन आठवड्यानंतरच शूटिंगवर परतणार आहे भारती सिंग, शोच्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये दिसणार

किरण जैन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरभी फक्त दोन भागांसाठी भारतीला रिप्लेस करत आहे.

टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना हिने टॅलेंटवर आधारित रिअ‍ॅलिटी शो 'हुनरबाज-देश की शान'मध्ये होस्ट म्हणून एंट्री घेतली आहे. सुरभीने कॉमेडियन भारती सिंगची जागा या शोमध्ये घेतली आहे. मात्र, यातही एक छोटासा ट्विस्ट आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, सुरभी फक्त दोन भागांसाठी भारतीला रिप्लेस करत आहे.

भारती सिंगने रविवारी (3 एप्रिल) तिच्या बाळाला जन्म दिला. भारती आणि हर्ष या दाम्पत्याचे हे पहिलेच बाळ आहे. प्रसूतीमुळे भारती काही दिवस कामातून ब्रेक घेणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, ती फक्त दोन आठवड्यांची सुट्टी घेणार असून 'हुनरबाज' या शोच्या ग्रॅण्ड फिनालेत सहभागी होऊ शकते, अशी चर्चा आहे.

भारतीला शेवटपर्यंत शोशी जुळून राहायचे आहे
शोच्या एका जवळच्या सूत्राने सांगितले की, "भारतीने आई होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत शूटिंग केले आहे. तिच्यासाठी तिचे काम महत्त्वाचे आहे. तिने निर्मात्यांना आश्वासन दिले आहे की, ती शोच्या फिनालेमध्ये उपस्थित असेल. भारतीच्या म्हणण्यानुसार, तिच्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात शोच्या निर्मात्यांनी आणि चॅनलने तिला खूप पाठिंबा दिला आणि आता निर्मात्यांना पाठिंबा देण्याची तिची पाळी आहे. शोबद्दल ती खूप भावूक आहे आणि शेवटपर्यंत तिला शोशी जुळून राहायचे आहे."

15 एप्रिलला शूट होऊ शकतो फिनाले एपिसोड
सूत्राने पुढे सांगितल्यानुसार, "शोचा शेवटचा भाग या महिन्याच्या 17 तारखेला प्रसारित केला जाईल, जो दोन दिवस आधी म्हणजे 15 एप्रिल रोजी शूट केला जाणार आहे. तोपर्यंत भारतीचे डिलिव्हरीचे 12 दिवस होऊन जातील. भारतीने टीमला वचन दिले आहे की, ती 15 तारखेला स्पर्धक आणि जजसोबत शूट करणार आहे. भारतीचे हे वचन लक्षात घेऊन निर्मात्यांनी सुरभीला फक्त दोन भागांसाठी साइन केले आहे. हे एपिसोड या वीकेंडच्या 9 आणि 10 तारखेला प्रसारित केले जातील."

ज्योतिष शास्त्रानुसार 3 तारखेला दिला बाळाचा जन्म?
भारती आणि हर्ष यांनी ठरवून '3' तारखेचा मुलाला जन्म दिला. या जोडप्याचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. त्यानुसार, त्यांना 3, 6 किंवा 9 या दिवसापैकी एका दिवशी प्रसूती करायची होती. या कारणास्तव, दाम्पत्याने 3 तारखेला आपल्या मुलाचे स्वागत केले. जवळपास 7 वर्षे डेटिंग केल्यानंतर भारतीने 2017 मध्ये लेखक हर्ष लिंबाचियासोबत लग्न केले.

बातम्या आणखी आहेत...