आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर एक्सक्लूझिव्ह:विकी-कतरिनाच्या लग्नात 15 लाखांची सुरक्षा व्यवस्था, जयपूरची एजन्सी 3 दिवसांसाठी तैनात करणार 150 गार्ड

किरण जैन13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या लग्नातील सुरक्षा व्यवस्था वाढवल्याचे ऐकिवात आहे.

विकी कौशल आणि कतरिना कैफ त्यांच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. डिसेंबरमध्ये दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. 7 ते 9 डिसेंबर दरम्यान राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेंस फोर्टवर हा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. दरम्यान, त्यांच्या लग्नाची बातमी मीडियात आल्यानंतर या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या लग्नातील सुरक्षा व्यवस्था वाढवल्याचे ऐकिवात आहे.

सिक्युरिटी सर्व्हिसेसने बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे
एका जवळच्या सूत्रानुसार, विकी आणि कतरिनाने त्यांच्या लग्नाच्या सुरक्षेची जबाबदारी जयपूरस्थित एमएच सिक्युरिटी सर्व्हिसेसला दिली आहे. ही एक खासगी सुरक्षा कंपनी असून आतापर्यंत आमिर खान, संजय दत्त, अर्जुन रामपाल, कमल हसन, टायगर श्रॉफ, हिमेश रेशमिया, राजकुमार राव, आलिया भट्ट, रितेश देशमुख, विद्युत जामवाल आणि फराह खान यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना सुरक्षा दिली आहे. राजस्थानमध्ये जेव्हा जेव्हा एखादा मोठा इव्हेंट असतो तेव्हा बहुतेक सेलिब्रिटी आपल्या सुरक्षेची जबाबदारी या एजन्सीवर सोपवतात.

150 सुरक्षा रक्षकांवर सोपवण्यात आली आहे जबाबदारी
विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत या कपलची या एजन्सीसोबत एकच भेट झाली आहे. सूत्रानुसार, आधी त्या बैठकीत 100 सुरक्षा रक्षक लग्नाला उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती, मात्र आता योजना बदलण्यात आली आहे. जेव्हापासून त्यांच्या लग्नाची बातमी मीडियामध्ये आली आहे, तेव्हापासून या दोन्ही कलाकारांची चिंता वाढली आहे. त्यांना त्यांच्या लग्नात कोणत्याही प्रकारचा त्रास नको आहे. या कपलने आता 100 ऐवजी 150 सुरक्षा रक्षकांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये महिला अंगरक्षक, पुरुष अंगरक्षक, सुरक्षा रक्षक यासह वाहतूक नियमन, सेलिब्रिटीज एक्सेस या सर्व्हिसेसचा समावेश आहे.

3 दिवसांसाठी खर्च होतील 15 लाख रुपये
या सर्विससाठी विकी आणि कतरिना जवळपास 15 लाख रुपये खर्च करत असल्याचे समजते. दोन्ही कलाकार कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ इच्छित नाहीत आणि म्हणूनच ते त्यांच्या 3 दिवसांच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी एजन्सीला जास्त रक्कम देण्यास तयार आहेत.

बातमीनुसार, विकी आणि कतरिना कैफ 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान एका तारखेला लग्न करणार आहेत. हे डेस्टिनेशन वेडिंग असेल, ज्यासाठी या जोडप्याने राजस्थानमधील सिक्स सेंस फोर्ट हॉटेल बुक केले आहे. व्हीआयपी लग्नाची तयारी येथे सुरू झाली आहे.

दिवाळीत झाली होती विकी-कतरिनाची रोका सेरेमनी
यावर्षी दिवाळीच्या खास मुहूर्तावर दिग्दर्शक आणि कतरिनाचा मानलेला भाऊ कबीर खान यांच्या घरी कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची रोका सेरेमनी पार पडली होती. रिपोर्टनुसार, कतरिनाची आई सुझान टरकोट आणि बहीण इसाबेल कैफ या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. तर विकीच्या वतीने या रोका सेरेमनीत त्याचे आई-वडील वीणा कौशल आणि श्याम कौशल आणि भाऊ सनी कौशल उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...