आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:'पे-पर-व्यू' म्हणजे जेवढ्या वेळा चित्रपट बघायचा असेल तेवढ्या वेळा पैसे भरा, OTT वर पहिल्यांदा प्रदर्शित झाला सलमान खानचा चित्रपट

हिरेन अंतानीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • ओटीटी किंवा डीटीएच वर हा चित्रपट कसा बघता येईल हे जाणून घ्या...

सलमान खानचा 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' हा चित्रपट 13 मे रोजी हायब्रीड रिलीज झाला आहे. म्हणजेच, हा चित्रपट चित्रपटगृहांसह ओटीटी आणि डीटीएचवर एकाच वेळी प्रदर्शित झाला आहे. OTT आणि DTH वर हा चित्रपट प्रेक्षकांना पे पर व्ह्यू अंतर्गत बघता येणार आहे. पे पर व्ह्यूचा अर्थ म्हणजे जेवढ्या वेळा तुम्हाला हा चित्रपट बघायला असेल तेवढ्या वेळा तुम्हाला पैसे मोजावे लागतील. हा चित्रपट झी प्लेक्सवर एकदा बघण्यासाठी 249 रुपयांमध्ये बुकींग करावी लागेल.

बहुतेक राज्यांमध्ये कोरोनामुळे लॉकडाउनसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे बहुतेकांना शक्य नाही. अशा परिस्थितीत ओटीटी किंवा डीटीएच वर हा चित्रपट कसा बघता येईल हे जाणून घ्या...

 • तुम्ही थिएटरमध्ये राधे बघू शकाल का?

होय, जर आपल्या शहरातील चित्रपटगृहे सुरु असतील तर 13 मेपासून मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट तुम्ही बघू शकता. तेथे सगळ्यांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.

 • थिएटरशिवाय हा चित्रपट अजून कोठे पाहता येईल?

चित्रपटाचे सर्व हक्क झी ग्रुपकडे आहेत. 'पे पर व्ह्यू' मॉडेलवर झी हा चित्रपट रिलीज करत आहे. हे थिएटरमध्ये चित्रपट बघण्यासारखे आहे. फरक हा आहे की चित्रपटगृहांमध्ये प्रत्येकासाठी तिकीट घ्यावे लागते, परंतु 'पे पर व्ह्यू' मध्ये एक ठरविक रक्कम देऊन तुम्ही संपूर्ण कुटुंबासह ओटीटी किंवा डीटीएचवर एका स्क्रीनवर एकदा चित्रपट बघू शकता. मोबाइल, लॅपटॉप किंवा टीव्हीवर ओटीटी माध्यमातून चित्रपट बघता येईल. पण यासाठी चांगली इंटरनेट स्पीड असणे आवश्यक आहे.

 • घरबसल्या चित्रपट बघण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

झी प्लेक्सने एकदा चित्रपट पाहण्यासाठी 249 रुपये किंमत निश्चित केली आहे. तर, झी 5 आपल्या नवीन ग्राहकांना विशेष ऑफर देत आहे. जर त्यांनी 499 रुपयांचा राधे स्पेशल कॉम्बो ऑफर सबस्क्रिप्शन घेतली तर त्यांना एकदा राधेला बघायला मिळेल आणि संपूर्ण वर्षासाठी झी -5 ची सदस्यता मिळेल. या ऑफरच्या काही दिवस आधी तुम्ही जर सबस्क्रिप्शन घेतले असेल तर मात्र तुम्हाला राधे पाहण्यासाठी स्वतंत्रपणे 249 रुपये द्यावे लागतील.

 • 'पे पर व्ह्यू' आणि OTT सबस्क्रिप्शनमध्ये काय फरक आहे?

ओटीटी सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवरील सर्व कंटेंट पाहण्याची परवानगी असते. एक प्रकारे, आपण सर्व कंटेंटसाठी ओटीटी सबस्क्रिप्शन घेतो. परंतु 'पे पर व्ह्यू' मॉडेलमध्ये तुम्हाला खास वेब सीरीज किंवा चित्रपट पाहण्यासाठी किंमत मोजावी लागते. ठराविक सीरिज किंवा चित्रपटाव्यतिरिक्त तुम्हाला इतर कुठलाही कंटेंट बघता येत नाही.

 • हा चित्रपट डीटीएच प्लॅटफॉर्मवर कसा पहायचा?

टाटा स्काय, एअरटेल डीटीएच, डीटूएच आणि डिश टीव्ही या चार DTH प्लॅटफॉर्मवर झी -प्लेक्स उपलब्ध आहे. त्याच्या वेबसाइट किंवा अॅपद्वारे झी-प्लेक्स वर जा किंवा चॅनेल निवडून आपल्याला बुकिंग आणि पेमेंटची माहिती मिळेल, त्या सुचना फॉलो करा. काही डीटीएच प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवर किंवा फोन कॉलिंगद्वारे झी-प्लेक्सवर मूव्ही बुकिंगचा पर्यायदेखील देतात.

 • आपण किती वेळा चित्रपट पाहू शकाल?

हे 'पे पर व्ह्यू' मॉडेल आहे, म्हणजे एकदा पैसे दिले की आपण एकदा चित्रपट पाहू शकाल. आपल्याला टाइम स्लॉट निवडावा लागेल. आपण निवडलेल्या टाइम स्लॉटमध्येच चित्रपट बघता येईल. पण जर तुम्ही निवडलेल्या टाइम स्लॉटला चित्रपट बघू शकला नाहीत तर तुम्हाला पुन्हा पैसे द्यावे लागतील. जर आपण चित्रपट मध्येच थांबवला किंवा वीज गेली आणि निश्चित स्लॉट निघून गेला, तर आपल्याला पुन्हा चित्रपट पाहण्यासाठी पुन्हा पैसे द्यावे लागतील.

जर स्लॉटच्या वेळी वीज परत आली आणि तुम्ही पुन्हा सिस्टम सुरु केले तर तुम्हाला चित्रपटाचा उर्वरित भाग बघता येईल, त्यापुर्वीचा भाग तुम्हाला बघता येणार नाही. शिवाय तुम्ही भरलेले पैसेदेखील तुम्हाला परत केले जाणार नाहीत.

 • मोबाइल, टीव्ही की लॅपटॉप कुठे चित्रपट बघता येईल?

ही तुमची निवड आहे. चित्रपट मोबाइल, लॅपटॉप की टीव्हीवर बघयचा हे तुम्हाला ठरवायचे प्रक्रिया आणि शुल्क यात फरक नाही, परंतु आपण एका वेळी केवळ एका स्क्रीनवर चित्रपट बघू शकता. समजा तुम्ही यासाठी लॅपटॉपमध्ये लॉग इन केले आहे आणि चित्रपट प्ले केला आहे. आणि थोड्या वेळाने तुम्हाला टीव्हीवर चित्रपट बघावा वाटला तर तुम्ही लॅपटॉप बंद करु नका, त्यासह टीव्हीवर झी प्लेक्सवर तुमचे लॉग इन करुन चित्रपट बघणे सुरु ठेऊ शकता. एकदा थांबवल्यानंतर मात्र तुम्हाला पुन्हा चित्रपट बघण्यासाठी पुन्हा पैसे द्यावे लागतील.

 • हा चित्रपट डाउनलोड करु शकता का?

नाही, 'पे पर व्ह्यू' मॉडेलमध्ये डाउनलोड करणे शक्य नाही. चित्रपट तुम्हाला ऑनलाइनच बघता येईल. ऑफलाइन डाउनलोडचा पर्याय उपलब्ध नाही.

 • किफायतशीर काय ठरेल, चित्रपटगृह की पे पर व्ह्यू ?

जर संपूर्ण कुटुंब किंवा मित्रांना एकत्र चित्रपट पहायचा असेल तर 'पे पर व्ह्यू' मॉडेल अधिक किफायतशीर आहे. आपण घरी 8-10 लोक एकत्र येऊन फक्त 249 रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकता. आणि हा दर राधेसाठी निश्चित करण्यात आला आहे. आपल्याला काही चित्रपट केवळ 99 रुपयांमध्येदेखील बघता येऊ शकतील. येण्याजाण्याचा कोणताही खर्च होणार नाही, शिवाय कोरोनापासूनही सुरक्षित राहाल आणि पॉपकॉर्न आदिचे पैसेही वाचतील.

 • झी प्लेक्स व्यतिरिक्त 'पे पर व्ह्यू' कोण ऑफर करतो?

'पे पर व्ह्यू' हा पर्याय भारतात शेमारुने आणला आहे. यानंतर बुक माय शो देखील हा पर्याय देत आहे. मोबाइल सर्व्हिस प्रोवाइडर VI नेही 'पे पर व्ह्यू' सेवा सुरू केली आहे.

 • झी 5 वर हा चित्रपट कसा पहायचा?
 1. आपण सर्वप्रथम झी 5 अॅप किंवा त्याच्या वेबसाइट https://www.zee5.com/ वर जाणे आवश्यक आहे, तेथे लॉग इन करा, नंतर आपल्याला ZEEPlex विभागात जावे लागेल, तिथे राधे : योर मोस्ट वाँडेट भाई या चित्रपटाची निवड करा.
 2. मग आपल्याला टाइम स्लॉटचा पर्याय मिळेल. कोणत्या तारखेला, कोणत्या वेळी आपल्याला चित्रपट पहायला आवडेल, त्यानुसार स्लॉटची निवड करा.
 3. यानंतर, पेमेंट पर्याय येईल. 249 रुपये पैसे भरताच या चित्रपटाचा शो तुमच्यासाठी बुक केला जाईल.
 4. जर तुम्ही झी 5 वर 499 चा राधे कॉम्बो ऑफर घेतली, तर तुम्हाला फक्त टाइम स्लॉट बुक करावा लागेल. आपल्याला वेगळ्या पेमेंटची आवश्यकता नाही.ही कॉम्बो ऑफर किती काळ चालेल याबाबत कोणतीही वेळ मर्यादा निश्चित केलेली नाही, परंतु राधेनंतरही जास्तीत जास्त सब्सस्क्राइबर आपल्यासोबत जोडले जावे, अशी नक्कीच झी 5 ला वाटत असावे, हे उघड आहे. जोपर्यंत चित्रपटाचा मोमेंटम कायम राहील तोपर्यंत ही ऑफर राहील.
बातम्या आणखी आहेत...