आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'पुष्पा - द राइज' प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनची स्टाइलही लोकांना आकर्षित करत आहे, पण यामागे अल्लू अर्जुनची मेहनत आहे, ज्यामुळे त्याचा खांदा अजूनही दुखतो. दैनिक भास्करला दिलेल्या खास मुलाखतीत त्याने सिनेमापासून कौटुंबिक समीक्षकांपर्यंत रंजक उत्तरे दिली. वाचा खास मुलाखत...
चित्रपटात खांदा उचलण्याची आणि दाढीवरुन हाथ फिरवण्याची स्टाइल छान दिसत आहे, ही आयडीया कुणाची होती?
ती माझी आणि दिग्दर्शकाची कल्पना होती. मी फाईट शॉटमध्ये असे केले होते, मग दिग्दर्शकाने पाहिले आणि म्हणाले की ही स्टाइल चांगली आहे, आपण असेच करु. मी म्हणालो- असे करायचे? ते म्हणाले- हो, जेव्हा तू मोठ्या पडद्यावर असे केले तेव्हा छान वाटले. त्यामुळे चित्रपटात अनेकवेळा अल्लू अर्जुनने दाढीवर हाथ फिरवण्याची स्टाइल केली आहे.
कॅरेक्टरसारखी तुमची बॉडी लँग्वेज आजिबात नाही, तीन तासांच्या चित्रपटात ती कशी निभावली?
बॉडी लँग्वेजसाठी दिग्दर्शक म्हणत होते की मला काही खास देहबोली हवी आहे. जे पाहून थिएटरमधील लोक तुला बघून चालायला लागतील. काहीही कर पण असे कर. तीन-चार कल्पना होत्या, पण खांदा उचलणारी ही कल्पना चांगली वाटली. एक खांदा वर ठेवणे थोडे वेगळे वाटते आणि त्यात थोडी 'हिरोगिरी'पण दिसते. ही तीन तासांचे नाही, तर दोन वर्षांची मेहनत आहे. खांदा अजूनही दुखतो.
कुटुंबातील सर्वात मोठा समीक्षक कोण आहे?
प्रत्येकजण खूप सपोर्टिव्ह आहे. तरीही काही बोलायचे झाले तर, वडील मोठे निर्माते आहेत, त्यामुळे तेही चित्रपट पाहिल्यानंतर बोलतात. जवळचे मित्र, माझी पत्नी आहे, मुलेही बोलतात, त्यांना एखादी गोष्ट आवडली तर ती चांगली आहे सांगतात नाहितर हे वाईट होते असेही सांगतात.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एक दृश्य कापण्यात आले. यावर चाहत्यांची नाराजी असल्याचे ऐकले, काय सांगाल?
नाही-नाही तसे काही नव्हते. लेंथसाठी ते थोडेसे कापले गेले. कथेसाठी ते दृश्य एवढे महत्त्वाचे नव्हते. असते तर ठिक होते, पण ते काढून टाकले तर चित्रपट वेगाने पुढे जाईल. त्यामुळे एक सीन काढण्यात आला. त्याने काही फरक पडला नाही.
तुला फॅन्स मल्लु अर्जुन असेही म्हणतात. हे नाव कसे समोर आले?
बरेच मल्याळी माझे तेलुगु पिक्चर खूप पाहतात. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. माझे चित्रपट केरळमध्ये खूप चालतात. म्हणूनच ते मला प्रेमाने मल्लू अर्जुन म्हणतात.
ठीक आहे, तुमचा पहिला क्रश काय होता?
माझ लग्न झालेले आहे. घरी जावे लागेल. बायको आणि मुले बघतील. तू काय बोलत आहेस. भांडण फक्त बायकोशीच नाही तर मुलांशीही होईल.
पहिल्यांदा कॅमेरासमोर येण्याचा अनुभव कसा होता?
माझा पहिला चित्रपट गंगोत्री होता. त्याचे दिग्दर्शक के. राघवेंद्र राव होते ते कॅमेरा बोलत होते, तर मी अॅक्शन करत होतो. मी अॅक्शनपूर्वीच अॅक्शन सुरू करत होते. तेव्हा मला माहिती नव्हते की, त्यांनी अॅक्शन म्हटल्याच्यानंतर मला अॅक्शन सुरू करायची आहे. पहिले एक-दोन शॉट्स असे झाले की ते कॅमेरा बोलताच मी अॅक्शन करायला लागायचो. मला वाटले की कॅमेरा म्हटले की, मला अॅक्शन करावी लागेल. अॅक्शन म्हटल्याच्यानंतर अॅक्शन करायची आहे, हे मला माहिती नव्हते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.