आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर इंटरव्ह्यू:मृणाल म्हणाली - कोणत्याही पात्रासाठी आव्हान स्वीकारायला नेहमी तयार असते, अभिनयात भाषेला कधीच अडसर ठरू देत नाही

उमेश कुमार उपाध्याय6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृणाल ठाकूरचे 'जर्सी', ‘आंख मिचौली’ हे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. त्यानिमित्ताने तिच्याशी साधलेला हा खास संवाद...

‘लव्ह सोनिया’मधून पर्दापण करणाऱ्या मृणाल ठाकूरने बाटला हाऊस, सुपर 30, तूफान, धमाका आदी चित्रपटांत काम केले. आता तिचा ‘आंख मिचौली’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ‘लव्ह सोनिया’ आणि ‘गंगूबाई’ सारखे चित्रपट आणि विषयाचे समर्थन करणारी मृणाल ठाकूर म्हणाली...,

  • ‘लव्ह सोनिया’मधून तू करिअर सुरू केले. आज या विषयावर दिग्गज दिग्दर्शक आणि प्रसिद्ध हिरोइन मिळून ‘गंगूबाई’सारखा चित्रपट बनवत आहेस, यावर काय सांगशील?

मी आलियाची खूप मोठी चाहती आहे. ती मला खूपच जबरदस्त अभिनेत्री वाटते, कारण ती कोणतेही पात्र सहज साकारते आणि पात्र जिवंत करते. ‘गंगूबाई”च्या विषयामुळे त्या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. अशा प्रकारचे चित्रपट बनत असल्यामुळे खूप आनंद होत आहे. आलिया भट्ट असो की, संजय लीला भन्साळी, अशा महत्त्वाच्या व्यक्ती चित्रपट बनवत आहेत, त्याचा आनंद होत आहे, शिवाय अभिमानही वाटत आहे. अशा प्रकारचे चित्रपट बनत राहिले पाहिजेत, लोकांपर्यंत पोहोचायला हवेत, गंगूबाईचा संघर्ष, त्यांचा प्रवास लोकांना कळेल.'लव्ह सोनिया’ आणि ‘गंगूबाई’सारख्या चित्रपटातून त्या जगाच्या वेदना, दु:ख, त्यांच्या भावना, त्यांचे जीवन लोकांसमोर मांडले जाते, त्यामुळे अशा प्रकारचे चित्रपट बनायला हवेत. आलिया अशा प्रकारच्या चित्रपटाची निवड करत असल्याचा अभिमान वाटतो. शिवाय बॉलिवूड फक्त ग्लॅमर, मनोरंजनासाठी नव्हे तर त्यातून आजपर्यंत सामजाने ज्या व्यक्तींना नाकारले, त्यांच्यावर चित्रपट बनवत आहे, त्यांच्याविषयी लोकांना सांगत आहे, याचा आनंद होत आहे. समाजासाठी त्यांचे योगदान छोटे असो की मोठे, ते आपण कधीच सेलिब्रेट केले नाही. त्यामुळे चित्रपटाद्वारे आपण सेलिब्रेट करू शकतो.

  • दक्षिणेत काम करण्याचे खास धोरण आहे का?

मला जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचे. मग मराठी, हिंदी किंवा तेलुगू कोणताही. चित्रपटाचा विषय येतो तेव्हा भाषा अडथळा ठरत नाही, असे वाटते.

‘जर्सी’ या चित्रपटात मृणाल शाहीद कपूरसोबत स्क्रिन स्पेस शेअर करणार आहे.
‘जर्सी’ या चित्रपटात मृणाल शाहीद कपूरसोबत स्क्रिन स्पेस शेअर करणार आहे.
  • ‘जर्सी’ चित्रपटातील रंजक किस्सा सांग ?

कोरोनामुळे चित्रपट रखडला होता. मला क्रिकेट पाहण्याची आवड आहे, कारण माझे सर्व भाऊ क्रिकेट खेळायचे. भावासोबत मीही स्टेडियमवर जात होते. एकदा आम्ही सर्वच स्टेडियममध्ये बसून सचिन-सचिन ओरडत होतो. चित्रपटातही असेच एक दृश्य आहे. त्यात मी उभी राहून अर्जुन-अर्जुन म्हणून ओरडत आहे. दृश्य करताना हा माझ्या जीवनाचा एक भाग असल्याचे मला वाटले.

  • ‘जर्सी’साठी काय खास तयारी करावी लागली ?

तयारी म्हणजे, 1980 ते 90 च्या दशकात महिलांची काय प्राथमिकता असायची, ते मी माझ्या आईकडून आणि मैत्रिणींच्या आईकडून जाणून घेतले. बऱ्याच महिलांना भेटले, बोलले. त्यांचे जुने फोटो पाहिले. त्या काळात समाजाच्या काय अपेक्षा होत्या, विशेष करून उत्तर भारतात कोणते निर्णय घेतले जात होते, यावर दिग्दर्शकासेाबत चर्चा केली. शारीरिकरीत्या काहीच आव्हान नव्हते.

  • ‘पिप्पा’ आणि ‘आंख मिचौली’चित्रपटाविषयी मजेदार किस्से सांगू शकते का ?

'पिप्पा'मध्ये मला प्रियांशू पेन्यूली आणि ईशान खट्टरच्या धाकटी बहिणीची भूमिका करण्यात मजा आली. कारण ते मला नेहमी तसेच ट्रीट करत असत. शिवाय ‘आंख मिचौली’मध्ये परेश रावल सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून दोन गोष्टी शिकले. दृश्यात कशा प्रकारे जीव ओतायचा आणि दुसरे कॉमेडी करताना टायमिंगकडे लक्ष देणे. कॉमेडी माझ्यासाठी खूपच अवघड टास्क आहे.

बातम्या आणखी आहेत...