आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास बातचीत:प्रियामणी म्हणाली- 'मैदान'मधील माझी व्यक्तिरेखा अजय देवगणच्या पात्राला भावनिक आधार देते

उमेश कुमार उपाध्याय4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मैदान'च्या निमित्ताने....

अभिनेत्री प्रियामणी आगामी 'मैदान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. प्रियामणीने या चित्रपटासह तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल दिव्य मराठीशी खास बातचीत केली आहे.

  • 'चेन्नई एक्स्प्रेस' या चित्रपटातील तुझ्या कामाचे कौतुक झाले. मग 'मैदान' यायला इतका वेळ का लागला?

वास्तविक, चेन्नई एक्स्प्रेसपूर्वी मी रावण आणि रक्तचरित्र या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली होती. होय, चेन्नई एक्स्प्रेस नंतर थोडा वेळ लागला, कारण त्यानंतर बरेच प्रोजेक्ट्स ऑफर केले गेले. पण मी योग्य प्रोजेक्टची वाट पाहत होते, त्यामुळे थोडा वेळ लागला. चेन्नई एक्स्प्रेसनंतर मी फॅमिली मॅन आणि मैदान हे चांगले प्रोजेक्ट निवडले. अशा प्रकारे काम सुरू आहे.

  • मैदानसाठी कास्टिंग कसे झाले?

बोनी सर (बोनी कपूर) माझ्या पतीला चांगले ओळखतात कारण दोघांनी एकत्र खूप काम केले आहे. बोनी सरांनी माझ्या पतीला सांगितले की, मैदानमध्ये अशी एक भूमिका आहे, प्रिया करेल का? पात्राचे महत्त्व पाहून ते म्हणाले की हे चांगले पात्र आहे, का करणार नाही? मला आठवते की दुसऱ्याच दिवशी बोनी सरांच्या ऑफिसमध्ये गेले आणि माझी लूक टेस्ट झाली. त्यानंतर मी दिग्दर्शक अमित शर्मा यांची भेट घेतली. मैदान आणि माझ्या व्यक्तिरेखेबद्दल त्यांनी माहिती दिली. त्यानंतर या चित्रपटासाठी मला फायनल करण्यात आले.

  • 'मैदान' या चित्रपटातील तुझे पात्र कसे आहे आणि अजय देवगणशी तुझे नाते कसे आहे?

या चित्रपटात मी अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित असून रहीम साहब हे भारताचे पहिले फुटबॉल प्रशिक्षक होते. मी संपूर्ण वेळ चित्रपटात आहे असे मी म्हणणार नाही, कारण हा चित्रपट फुटबॉल आणि सय्यद अब्दुल यांच्याबद्दल आहे. अजय सरांच्या पात्राला भावनिक आधार देण्यासाठी माझे पात्र आहे. जिथे त्याची गरज आहे, तिथे आहे. या चित्रपटात ती अजयचे मनोबल वाढवताना दिसणार आहे. अशा प्रकारे पती-पत्नीमध्ये अनेक चांगले सीन्स पाहायला मिळतील.

  • हा चित्रपट 1952 ते 1962 या त्यांच्या सुवर्णकाळातील आहे. मग भूमिकेसाठी तयारी कशी झाली?

मी इतका होमवर्क केला नाही. अमित शर्मा यांनी माझ्या व्यक्तिरेखेबद्दल खूप छान माहिती दिली. माझ्यापेक्षा अमित यांनी सय्यदच्या आयुष्यावर, कुटुंबात आणि खेळाविषयी जास्त संशोधन केले आहे, त्यामुळे तेच सांगू शकतात. मी माझ्या व्यक्तिरेखेसाठी फारसा होमवर्क केलेला नाही. अमित शर्मा यांच्यावर विश्वास ठेवून, त्यांचे व्हिजन फॉलो केले आहे आणि ते चित्रपटातही पाहायला मिळेल. वजन वाढवण्यासाठी अशी कोणतीही आवश्यकता नव्हती.

  • याची शूटिंग कुठे कुठे झाली होती? ज्या प्रकारे चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडत आहेत, त्यावरुन 3 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार का?

मी मुंबईत शूट केले आहे, बाकीचे शूटिंग कोलकात्यात आणि कदाचित हैदराबादमध्येही झाले आहे. पहिला लॉकडाउन संपण्यापूर्वी माझा भाग शूट करण्यात आला होता. हा चित्रपट ३ जूनला प्रदर्शित व्हावा, अशी आम्ही प्रार्थना करत आहोत. मला आशा आहे की तोपर्यंत परिस्थिती चांगली होईल. जर काही अपडेट असेल तर आम्हाला प्रोडक्शन, बोनी सर आणि अमित शर्मा यांच्याकडून कळेल.

  • अजय देवगणसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

खूप छान राहिला. मी त्याच्यासोबत एकूण 10-11 दिवस काम केले. चित्रीकरणावेळी खूप धमाल केली. त्याच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाले. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर सर्वांना आवडेल अशी आशा आहे. तरीही जास्त वेळ घालवण्याची संधी मिळाली नाही. आम्ही बहुतेक सेटवर राजामौलीबद्दल बोलायचो. याशिवाय आम्ही साऊथच्या सिनेमाबद्दल बोलत होतो.

  • साऊथच्या चित्रपटाची लोकप्रियता पाहून ही इंडस्ट्री बॉलिवूडला ओव्हरटेक करेल, असे काही लोकांचे मत आहे. याविषयी काय सांगशील?

साऊथ इंडस्ट्री ओव्हरटेक करेल की नाही, मला माहीत नाही. पण साऊथच्या चित्रपटांना आणि कलाकारांना नाव आणि ओळख मिळत आहे याचा मला आनंद आहे.

  • आगामी प्रोजेक्ट?

सध्या 'मैदान' हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर दक्षिणेत माझे दोन प्रोजेक्ट आहेत. एक प्रोजेक्ट 11 फेब्रुवारी रोजी OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. राणा दग्गुबतीसोबतचा आणखी एक प्रोजेक्ट, जो यावर्षी रिलीज होऊ शकतो. याशिवाय पुढील महिन्यात जॅकी श्रॉफ आणि सनी लिओनीसोबत 'कोटेशन गँग' हा तमिळ चित्रपट करत आहे. आणखी अनेक प्रोजेक्ट्सना तोंडी होय म्हटले आहे. ते साइन केल्यावरच मी अपडेट देऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...