आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त एका मिनिटात फिल्म रिव्ह्यू:VFX आणि कॉमिक टायमिंग दमदार, पण वरुण-क्रितीच्या 'भेडिया'ने केला अपेक्षाभंग

उमेशकुमार उपाध्यायएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

वरुण धवन आणि क्रिती सेनन स्टारर 'भेडिया' हा चित्रपट आज (25 नोव्हेंबर) प्रदर्शित झाला आहे. पण चित्रपटाने प्रेक्षकांचा अपेक्षाभंग केला आहे. 'भेडिया' बॉक्स ऑफिसवर किती प्रभाव टाकू शकेल हे येणारा काळच सांगेल. पण चित्रपटाने करमणूक करण्यापेक्षा निराशा केली आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?
चित्रपटाची कथा दिल्लीत राहणाऱ्या भास्कर (वरुण धवन) ची आहे, ज्याला आयुष्यात सर्व सुखसोयी मिळवायच्या आहेत. भास्कर, बग्गा (सौरभ शुक्ला) सोबत काम करतो.

बग्गाच्या आदेशावरुन भास्कर त्याचा चुलत भाऊ जनार्दन (अभिषेक बॅनर्जी) सोबत आदिवासींची जमीन आणि जंगलातील झाडे तोडून रस्ता तयार करण्याच्या योजनेसाठी अरुणाचल प्रदेशात जातो.

तिथे भास्करची भेट जोमिन (पॉलिन कबाक) आणि पांडा (दीपक डोबरियाल) यांच्याशी होते. हे दोघेही भास्करला त्याच्या रस्ता बांधणीच्या योजनेत मदत करतात, आदिवासींशी बैठका आयोजित करण्यापासून त्यांना जागा दाखवण्यापर्यंतची काम हे दोघे करतात. एके दिवशी जंगलात एक लांडगा भास्करचा चावा घेतो. पशुवैद्य अनिका मित्तलच्या (क्रिती सॅनन) घरी तो उपचारासाठी जातो.

यानंतर कथेत एक रंजक ट्विस्ट येतो, जो चित्रपटगृहातच पाहिल्यावर अनुभवायला मिळेल, एवढी मोठी योजना साकारताना भास्करला कोणती आव्हाने आणि अडचणी येतात, त्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होतो की नाही, हे सर्व चित्रपट बघितल्यानंतरच कळेल.

चित्रपटाचा प्लस पॉइंट काय?
चित्रपटाचे सर्वात मजेदार पैलू म्हणजे त्याचे लोकेशन्स, व्हीएफएक्स, जे कथेत जिवंतपणा आणतात. चित्रपटात ट्विस्ट आणण्यासाठी गुलजार, हिमेश रेशमिया यांच्या गाण्यांसह काही जुन्या चित्रपटांचे संदर्भ ऐकायला मिळणार आहेत.

चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर वरुण धवनपासून ते क्रिती सेनन, दीपक डोबरियाल, अभिषेक बॅनर्जीपर्यंत सर्वांनीच मेहनत घेतली आहे. हॉरर, कॉमेडी जॉनरच्या या चित्रपटात दीपक डोबरियाल कमी वेळात जास्त प्रभावी वाटतो. अभिषेकनेही चांगली सोबत केली आहे.

कथा थोडी काल्पनिक वाटते. शेवटी 'भेडिया' त्याच्या कथेसह जंगलातील झाडे तोडल्याने होणारे नुकसान याविषयीही संदेश देतो.

संपूर्ण रिव्ह्यू पाहण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...