आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भीड' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज:चित्रपट सांगणार कोरोना लॉकडाउनच्या वेदना

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'भीड' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर तुम्हाला त्या काळात परत घेऊन जातो जिथे कोरोनाच्या लाटेनंतर लॉकडाउनचा त्रास सहन करावा लागला. ट्रेलरची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आज रात 12 बजे से पूरे देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है' या घोषणेने होते.

हा चित्रपट 24 मार्चला प्रदर्शित होणार
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तबलिगी जमातमधील श्रीमंत व्यक्तीचा संघर्ष, जातिवाद, गरिबी, पोलीस अत्याचार, लोकांची लाचारी, शहरांच्या सीमा बंद करणे असे चित्रण करण्यात आले आहे. या कठीण काळातही लोक माणुसकी विसरून धर्म आणि जातीच्या नावावर लढताना दिसत आहेत. राजकुमार राव, भूमी पेडणेकर, दिया मिर्झा, पंकज कपूर, आशुतोष राणा, कृतिका कामरा, वीरेंद्र सक्सेना आणि आदित्य श्रीवास्तव असे अनेक कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 24 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...