आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेते मनोज तिवारींना कन्यारत्न:वयाच्या 51 व्या वर्षी तिसऱ्यांदा झाले वडील, पत्नी सुरभीने दिला मुलीला जन्म

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोजपुरी अभिनेते आणि भाजपा खासदार मनोज तिवारी तिस-यांदा वडील झाले आहेत. त्यांची पत्नी सुरभी तिवारीने मुलीला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे वयाच्या 51 व्या वर्षी ते पुन्हा वडील झाले आहेत. सोशल मीडियावर पत्नीचा हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत मनोज यांनी ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.

मनोज तिवारी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांची पत्नी रुग्णालयाच्या बेडवर दिसत आहे. फोटो शेअर करत मनोज यांनी लिहिले की, 'तुम्हाला सांगायला फार आनंद होत आहे की आमच्या घरी लक्ष्मीच्या पाठोपाठ सरस्वतीचे आगमन झाले आहे. घरात लहान मुलीचे आगमन झाले आहे. तिच्यावर तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद असेच असू द्या.'

मनोज आणि सुरभी यांचे हे दुसरे कन्यारत्न आहे. त्यांना एक मुलगी आहे. तर पहिल्या पत्नीपासूनही मनोज तिवारी यांना एक मुलगी आहे. सुरभी ही त्यांची दुसरी पत्नी आहे.

गेल्याच महिन्यात झाले होते सुरभीचे डोहाळे जेवण
गेल्याच महिन्यात मनोज तिवारी यांनी आपल्या पत्नीचे डोहाळे जेवणं घातले होते. या कार्यक्रमाला मनोज तिवारी आणि सुरभी तिवारी यांचे निकटवर्तीय उपस्थित होते. त्यांनी इन्स्टाग्रामवर डोहाळे जेवणाचा व्हिडिओ शेअर केला होते. मनोज यांनी इन्स्टाग्रामला व्हिडिओ शेअर करताना ‘काही क्षण शब्दांत सांगता येत नाहीत, फक्त ते अनुभवले जाऊ शकतात’ असे म्हटले होते.

वयाच्या 49 व्या वर्षी थाटले होते दुसरे लग्न
सुरभी ही मनोज तिवारी यांची दुसरी पत्नी आहे. पहिल्या पत्नीपासून मनोज यांना एक मुलगी असून तिचे नाव रिती तिवारी आहे. 2020 मध्ये मनोज यांनी सुरभीसोबत लग्नगाठ बांधली होती. वयाच्या 49 व्या वर्षी मनोज तिवारी यांनी दुसरे लग्न केले होते. पण त्यांनी हे लग्न बरेच दिवस लपवून ठेवले होते. मुलीच्या जन्मानंतर त्यांचे दुसरे लग्न झाल्याचे उघड झाले होते.

कोण आहे सुरभी तिवारी?
सुरभी भोजपुरी गायिका आहे. तिने अनेक लोकप्रिय भोजपुरी गाणी गायली आहेत. सुरभीचा जन्म बिहारमधील पाटणा येथे झाला. याच ठिकाणी तिचे शिक्षणसुद्धा झाले. मनोज तिवारी यांनी सुरभीच्या आधी राणी तिवारीसोबत लग्न केले होते. 1999 मध्ये राणी यांच्यासोबत मनोज तिवारी यांनी लग्न केले होते. 13 वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी 2012 मध्ये घटस्फोट घेतला. राणी आणि मनोज यांना एक मुलगी आहे. घटस्फोटाच्या आठ वर्षांनंतर मनोज तिवारी यांनी सुरभीशी लग्नगाठ बांधली होती.

बातम्या आणखी आहेत...