आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत आणखी एक आत्महत्या:भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकने केली आत्महत्या, मृत्यूपूर्वी फेसबुक लाइव्ह येऊन रडत आत्महत्या करण्याचे दिले होते संकेत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुपमा पाठकने लाइव्ह व्हिडिओमध्ये म्हटले की, जर तिचा मृत्यू झाला तर कोणालाही तिच्या मृत्यूसाठी जबाबदार धरू नये.
  • एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्याविषयी सहानुभूती दाखवणा-या लोकांना अनुपमाने फटकारले.

टीव्ही अभिनेता समीर शर्मानंतर भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 40 वर्षीय अनुपमाने 2 ऑगस्ट रोजी मुंबईतील दहिसर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, समीर शर्माच्या निधनानंतर ही बातमी माध्यमांसमोर आली.

अनुपमाने मृत्यूला कवटाळण्यापूर्वी फेसबुकवर लाइव्ह करत चाहत्यांशी संवाददेखील साधला होता. यावेळी तिने आत्महत्येचे संकेत दिले होते. यानंतर सुमारे 26 मिनिटांनी तिने फेसबुकवर शेवटची पोस्ट टाकली, ज्यामध्ये तिने लिहिले होते, "बाय बाय गुड नाईट."

  • मृत्यूनंतर सहानुभूती दाखवणा-यांना फटकारले

1 ऑगस्ट रोजी रात्री 11:54 वाजता अनुपमा फेसबुकवर 10 मिनिटे 4 सेकंदासाठी लाइव्ह आली होती. यावेळी ती रडत होती आणि मृत्यूनंतर सहानुभूती दाखवणा-यांना तिने फटकारले. अनुपमा म्हणाली, नमस्कार. मी माझ्या गोष्टी फेसबुकवर शेअर करायला आले आहे. एखाद्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या जवळचे लोक, मित्र परिवार म्हणतात, की आम्हाला आधी का सांगितले नाही, आम्ही मदत केली असती. परंतु, या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात कोणीच मदत करत नाही. काही जण उगाच आत्महत्या करत नाहीत. त्यामागे काही कारणं असतात.

कुणीही कुणाच्या समस्या सोडवत नाही. मी फार जवळून अनुभव घेतला आहे. लोक तुमच्या बोलण्याचा कधीच सरळ विचार करत नाहीत. ते कायम चुकीचा अर्थ काढतात. जर तुम्ही कोणाला सांगितलं की मी आत्महत्या करणार आहे., तर काही जणांची पहिली प्रतिक्रिया असते.. हे आम्हाला नको सांगू उगाच आमचं नाव या प्रकरणात येईल. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवू नका. सगळे खोटारडे आणि स्वार्थी असतात. कोणीच कोणाच्या मदतीसाठी येत नाही.

आपल्या समस्या कोणालाही सांगू नका. कोणालाही आपला मित्र मानू नका. कोणीही कोणाचा मित्र नाही. ही खोट्याची दुनिया आहे. आपल्या शब्दांची चेष्टा केली जाते, असे अनुपमाने आपल्या फेसबुक लाइव्हमध्ये म्हटले.

  • अनुपमाने सुसाइड नोटही सोडली

अनुपमाने आत्महत्येपूर्वी एक सुसाइड नोटही लिहिली होती. पोलिसांना घटनास्थळावरुन ही सुसाइड नोट मिळाली आहे. त्यानुसार तिने आर्थिक अडचणींमुळे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजते. सोबतच तिने मनीष झा नावाच्या व्यक्तीलाही आत्महत्येस जबाबदार ठरवले आहे. अनुपमाने आरोप लावला की, या व्यक्तीने मे महिन्यात तिची दुचाकी घेतली होती, मात्र नंतर ती परत देण्यास नकार दिला होता.

अनुपमा ही भोजपुरी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होती.

बातम्या आणखी आहेत...